ETV Bharat / health-and-lifestyle

उन्हाळ्यामध्ये जास्त केस गळतात! शरीरात असू शकते 'ही' कमतरता - CAUSES HAIR LOSS IN SUMMER

उन्हाळ्यात धूळ आणि प्रदूषणामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. कधीकधी जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील केस गळतात.

HAIR CARE TIPS  CAUSES HAIR LOSS IN SUMMER  HAIR LOSS TIPS
उन्हाळ्यामध्ये जास्त केस गळतात! शरीरात असू शकते 'ही' कमतरता (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : May 13, 2025 at 8:47 PM IST

2 Min Read

Causes Hair Loss In Summer: उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे लोकांना उष्णतेसोबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उष्णतेमुळे शरीरावर तर परिणाम होतात. सोबत उन्हाळ्यात धूळ, घाम, आणि प्रदूषणामुळे त्वचेचा रंग फिकट पडतो. तसेच उन्हळ्यात सर्वांना भेडसवणारी आणि सामन्य समस्या म्हणजे केस गळती. उन्हाळ्यात अनेक लोकांना केसगळीच्या समस्येचा सामना करावा लागतो.

HAIR CARE TIPS  CAUSES HAIR LOSS IN SUMMER  HAIR LOSS TIPS
उन्हाळ्यामध्ये जास्त केस गळतात! शरीरात असू शकते 'ही' कमतरता (Getty Images)

सध्या केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. जर वयानुसार केस गळत असतील तर ते वृद्धत्वाचे लक्षण आहे. मात्र, अनेक जण लहान वयातच केस गळतीच्या समस्येन त्रस्त आहेत. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी अनेक लोक बजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादने खरेदी करतात. परंतु, महागडे औषधं आणि इतर प्रोडक्ट वापरून देखील विशेष फरक पडत नाही. यामुळे वेळ आणि पैसे खर्च होतात. केस गळतीची अनेक कारण असू शकतात. बऱ्याचदा जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे केस गळण्यास सुरुवात होते. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे ते होत आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी आपण काय खावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

  • व्हिटॅमिन डी: याला सनशाइन व्हिटॅमिन असेही म्हणतात. केस लांब आणि जाड करण्यात व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर टाळू कमकुवत होऊ शकतो. परिणामी केस गळतीची समस्या उद्भवते. शरीराची व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी सकाळच्या उन्हात काही वेळ घालवावे. तसंच आहारात अंड्याचा पिवळा बलक, दूध किंवा मासे यांचा समावेश करा. यामुळे केसगळतीची समस्या दूर होऊ शकते.
  • व्हिटॅमिन बी7 (बायोटिन): केसांच्या वाढीसाठी हे देखील एक आवश्यक जीवनसत्व आहे. त्यामुळे केस चमकदार होतात. त्याच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात, ज्यामुळे केस गळतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी, अंडी, काजू, सोया किंवा संपूर्ण धान्य खाण्यास सुरुवात करावी.
  • व्हिटॅमिन बी 12: व्हिटॅमिन बी १२ रक्ताभिसरण सुधारते. परिणामी, ऑक्सिजन आणि पोषक तत्वे सहजपणे टाळूपर्यंत पोहोचू शकतात. त्याच्या कमतरतेमुळे, केसांची मुळं कमकुवत होऊ लागतात. दूध, दही, चीज, अंडी आणि मांस ही कमतरता भरून काढतात. यामुळे आहारात याचा समावेश करणे गरजेचं आहे.
  • व्हिटॅमिन ई: व्हिटॅमिन ई एक अँटी-ऑक्सिडंट आहे. हे टाळूचे आरोग्य सुधारते आणि केसांना पोषण देते. त्याच्या कमतरतेमुळे केस निर्जीव आणि कोरडे होतात. परिणामी, केस तुटणे सामान्य होते. यासाठी आहारात सूर्यफुलाच्या बिया, बदाम, शेंगदाणे आणि एवोकॅडो यांचा समावेश करावा.
  • व्हिटॅमिन ए: जर शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर केस गळणे सामान्य आहे. खरं तर, ते टाळूमध्ये सेबम (एक प्रकारचे तेल) चे उत्पादन नियंत्रित करते. तथापि, त्याची कमतरता आणि प्रमाणापेक्षा जास्त दोन्ही केसांसाठी हानिकारक आहेत. त्यासाठी आहारात गाजर, गोड बटाटे आणि दूध नक्की समाविष्ट करा.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6380979/

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.