ETV Bharat / health-and-lifestyle
गरोदरपणात गॅसची समस्या कशी टाळायची? तज्ञांनी दिला सल्ला
जास्त फायबरयुक्त पदार्थांमुळे पोटाच्या समस्या उद्भवतात. ज्यामुळे गरोदर महिलांमध्ये पोटफुगीची समस्या सामान्य आहे. या समस्येपासून निराकरण कसं करावं ते पाहूया.

Published : September 17, 2025 at 7:07 PM IST
Gas During Pregnancy: गरोदर महिलांमध्ये पोटाच्या समस्या सर्वात सामान्य आणि त्रासदायक समस्यांपैकी एक आहेत. पोट फुगणे, गॅस होणे, अस्वस्थता आणि पोट भरल्यासारखे वाटणे यासारख्या समस्या जवळजवळ सर्व गरोदर महिलांमध्ये होतात. हार्मोनल बदलांपासून ते खाण्याच्या सवयींमधील बदलांमुळे या समस्या उद्भवू शकतात.

गुरुग्राम येथील क्लाउड 9 ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या संचालक डॉ. सेठना जैन यांच्या मते, महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि हार्मोनल बदलांमुळे गर्भधारणेदरम्यान पोटदुखी समस्या उद्भवू शकते. परंतु काही गोष्टींचं पालन केल्यास ही समस्या टाळली जावू शकते.

गरोदर महिलांमध्ये पोटफुगीच्या समस्यांची कारणं
- हार्मोनल बदल: गर्भधारणेदरम्यान, प्रोजेस्टेरॉनची पातळी खूप वाढते. यामुळे पचनसंस्थेचे स्नायू सैल होतात. परिणामी पचनक्रिया मंदावते आणि गॅस निर्मिती वाढते. यामुळे पोटफुगीची समस्या उद्भवते.
- गर्भाशयावर येणारा दाब: गर्भाशय वाढत असताना, ते आतड्यांवर दबाव आणते. यामुळे पचनसंस्थेतून गॅस जाणे कठीण होऊ शकते. यामुळे पोटाच्या अनेक समस्या देखील उद्भवू शकतात.
- पचनसंस्थेतील बदल: गर्भधारणेनंतर, पचनसंस्थेच्या सामान्य कार्यात काही बदल होतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवतात.
- आहारात बदल: जास्त प्रमाणात फायबर असलेले किंवा पोटाच्या समस्या निर्माण करणारे काही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटफुगी होऊ शकते.
- द्रवपदार्थ साठणे: गरोदर महिलांना अनेकदा द्रव साठण्याचा त्रास होतो, ज्यामुळे पोटफुगी आणि गॅस होऊ शकतो.
- हवा गिळणे: खूप लवकर खाणे, जेवताना बोलणे किंवा स्ट्रॉमधून पाणी पिणे यामुळे तुम्ही जास्त हवा गिळू शकता. यामुळे पोट फुगू शकते.

गर्भधारणेदरम्यान पचनाच्या समस्यांमुळे महिलांना खूप त्रास होऊ शकतो आणि दैनंदिन कामे करणे कठीण होऊ शकते. अशा समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत!
- वारंवार जेवण करा: पचनाचा भार कमी करण्यासाठी कमी प्रमाणात आणि वारंवार जेवण करा.
- गॅस निर्माण करणारे पदार्थ टाळा: बीन्स, कोबी, कार्बोनेटेड पेये आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करा, कारण यामुळे गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
- हायड्रेटेड रहा: दररोज भरपूर पाणी प्या. बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठी दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.यामुळे बद्धकोष्ठता टाळता येईल आणि पचन सुधारेल. तसंच पोटफुगी वाढवणारे कार्बोनेटेड आणि साखरयुक्त पेय टाळा.
- नियमित व्यायाम करा: पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटफुगीसारख्या समस्या टाळण्यासाठी चालणे आणि योगासारखे व्यायाम करा.
- अन्न चावून खा: तुम्ही जे अन्न खाता ते हळूहळ आणि नीट चावून खा. यामुळे हवा गिळण्याची शक्यता कमी होईल आणि पचन सुधारेल.
- जास्त फायबर असलेले पदार्थ खाणे मर्यादित करा: जास्त फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने पोटफुगी होऊ शकते. जर तुम्ही जास्त फायबर असलेले पदार्थ खाल्ले तर पुरेसे पाणी प्यावं.
- कार्बोनेटेड पेये टाळा: कार्बोनेटेड पेये गॅस आणि पोटदुखीसारख्या समस्या निर्माण करू शकतात. म्हणून अशी पेये टाळा. त्याऐवजी, हर्बल टी किंवा हर्बल पेये घ्या.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

