Health Benefits Of Papaya Seeds: पपईच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल माहिती नसलेला कोणीही नाही. पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबरसह जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पपई खाताना बिया आपण बिया खाणं टाळतो. मात्र, आपण फेकून देत असलेल्या या बियां आरोग्यासाठी उत्तम आहेत. पपईच्या बिया पपई इतक्याच पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. त्यात अँटीमायक्रोबियल गुणधर्म, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. विषेशत: महिलांसाठी पपईच्या बिया अनेक प्रकारे फायदेशीर आहेत.

जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, पपईच्या बिया हानिकारक बॅक्टेरियाशी लढण्यासाठी आणि संसर्गाशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास आणि संधिवातासारख्या आजारांना कमी करण्यास मदत होऊ शकते. पपईच्या बिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. भूक कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी या बिया उत्तम असल्याचं तज्ञांच मत आहे. पपईच्या बियांचे फायदे जाणून घ्या.

- अँटिऑक्सिडंट गुणधर्म: पपईच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ते खाल्ल्याने शरीरातील मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय होण्यास मदत होते आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. हे शरीराचे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी आणि हृदयरोगासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
- कोलेस्ट्रॉल कमी करते: पपईच्या बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम आहेत कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. तसंच त्यात लेसिथिन आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड देखील असतात. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी हे फायदेशीर आहेत. पपईमध्ये पपेन सारखे एन्झाईम्स पचनक्रियेसाठी उपयुक्त आहेत.

- पचनक्रिया सुरळीत: पपईच्या बिया पचन सुधारण्यासाठी आणि पचना संबंधित समस्या सोडवण्यासाठी मदत करते. तसंच आतड्यांमधील निरोगी बॅक्टेरिया संतुलित करण्यासाठी आणि आतड्यांचे एकूण आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर आहेत.
- यकृताचे आरोग्य: पपईच्या बियांचे हेपेटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात, असे फायटोथेरपी रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे. हे हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि यकृताचे एकूण कार्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. पपईच्या बिया मद्यपानाच्या हानिकारक प्रभावांपासून यकृताचे संरक्षण करण्यास देखील मदत करू शकतात.
- किडनी आरोग्य: टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की पपईच्या बियांमध्ये किडनी आरोग्याचे रक्षण करण्याची क्षमता देखील असते. हे विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून मूत्रपिंडांचे संरक्षण करण्यास मदत करेल. परंतु याची पुष्टी करण्यासाठी अधिक अभ्यास आवश्यक आहेत.
- कर्करोगविरोधी गुणधर्म: 2016 मध्ये बीएमसी कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन अँड थेरपीजमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, पपईच्या बियांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात. नियमितपणे पपई खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. असं तज्ञांचं म्हणणं आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)