ETV Bharat / health-and-lifestyle

मुलांना लागलेल्या मोबाईलच्या सवयीनं परेशान आहात? फक्त लावा 'ही' सवय

आजकाल लहांनापासून मोठ्यापंर्यंत सर्व मोबाईलच्या आहारी गेले आहेत.लहान मुलांना डिजिटल स्क्रीनपासून दूर ठेवायंच असेल तर सायकलिंग हा एक चांगला पर्याय आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे.

HEALTH BENEFITS OF CYCLING  BENEFITS OF CYCLING  CYCLING IS BEST FOR CHILD HEALTH
मोबाईलचे दुष्परिणाम (Freepik)
author img

By ETV Bharat Health Team

Published : February 14, 2025 at 7:54 AM IST

|

Updated : February 14, 2025 at 11:36 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

Health Benefits Of Cycling: ज्या वयात मुलांनी खेळलं पाहिजे, गाणी म्हटंली पाहिजे सोबतच अभ्यास केला पाहिजे अशा वयात ती मोबाईलच्या आहारी गेली आहेत. मुलं तासंतास सेल फोन, टॅब्लेट आणि संगणकांना चिकटलेली असतात. शाळेतून घरी येताचं ते स्क्रीनसमोर बसतात. सुट्टीच्या दिवशी तर त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर जातो. यामुळे मुलांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यांना डिजिडल स्क्रीनपासून दूर कसं ठेवावं हा अनेक पालकांच्या चिंतेचा विषय आहे. परंतु तज्ञांच्या मते मुलांना स्क्रिनपासून दूर ठेवण्यासाठी सायकलिंग हा एक पर्यायी मार्ग आहे. जर मुलांनी दररोज एक तास सायकल चालवली तर त्यांचं मानसिक तसंच शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहू शकेल.

HEALTH BENEFITS OF CYCLING  BENEFITS OF CYCLING  CYCLING IS BEST FOR CHILD HEALTH
सायकल चालवण्याचे फायदे (ETV Bharat)
  • एरोबिक व्यायाम: सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम आहे. जो शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन प्रदान करतो. सायकल चालवल्याने पाय आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. हँडल्स संतुलित केल्याने हाताच्या स्नायूंचा व्यायाम होतो. सायकलिंगमुळे फुफ्फुसांची क्षमता दुप्पट होते. तसंच बाहेर सायकलिंग केल्यानं मुलांना व्हिटॅमिन डी मिळते.
  • मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले: सायकल चालवताना मेंदू शरीराचे समन्वय साधतो. हे तुम्हाला हात, पाय आणि डोळ्यांचे समन्वय साधण्यास मदत करते. जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे एंडोर्फिन बाहेर पडतात. त्यामुळे मुलं आनंदी राहतात तसचं त्यांचा उत्साह वाढतो. यामुळे एकटेपणा, ताणतणाव, चिंता आणि नैराश्य सारख्या समस्या नाहिशा होतात.

लठ्ठपणा रोखते: "मुलांना सायकलिंगची सवय लावणे खूप फायदेशीर आहे. जंक फूडमुळे शरीरात तयार झालेली अनावश्यक चरबी जाळण्यापासून सायकलिंग रोखते. यामुळे मुलांमधील लठ्ठपणाची समस्या टाळता येवू शकते. तसंच दररोज सायकल चालवणारी मुले खूप सतर्क असतात. त्यांना इतर खेळांमध्ये भाग घेण्यास अधिक रस निर्माण होतो. तसंच ते आव्हानं स्वीकारण्यास नेहमी तयार राहतात. दररोज ४ ते ५ किलोमीटर सायकलिंग केल्याने रक्ताभिसरण सुधारते. हे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.

निलोफर रुग्णालय बालरोगतज्ज्ञ, डॉ. उषाराणी,

  • समाजात एकरूप होण्याची गरज: काही मुले शाळेत किंवा घरातपर्यंतच मर्यादित असतात. त्यांना इतरांना भेटायला आवडत नाही. अशा मुलांना सामाजिक संवादात सहभागी होण्यासाठी सायकलिंगला प्रेरित करणे आवश्यक आहे. इतर मुलांसोबत सायकलिंग केल्यानं नवीन मैत्री निर्माण होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, यामुळे ते हळूहळू त्यांच्या फोनपासून दूर जातात. सायकलिंग आणि पोहणे या आयुष्यभर न विसरणाऱ्या गोष्टी आहेत. सायकल चालवणे पर्यावरणासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कारण सायकल चालवल्यानं कार्बन फूटप्रिंट कमी होतात. जे पर्यावरणाचं समतोल राखण्यास फायदेशीर आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://www.betterhealth.vic.gov.au/health/healthyliving/cycling-health-benefits

हेही वाचा

Last Updated : February 14, 2025 at 11:36 AM IST