Drumstick Water For Hair Growth: मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या शेंगाचे झाड. ही अतिशय उपयुक्त वनस्पतींपैकी एक आहे. प्राचीन काळापासून ते केवळ शरीराच्या आरोग्यासाठीच नव्हे तर केसांच्या वाढीसाठी उपुयक्त ठरली आहे. यात आवश्यक जीनसत्त्वे अ,ब, क, ई, खनिजे, अमीनो अॅसिड, लोह, जस्त मुबलक प्रमाणात आढळतात. तसंच हे अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. मोरिंगा केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. हे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून टाळूचे संरक्षण करते आणि केस मजबूत करते. तसंच केस वाढवण्यासाठी देखील हे चांगले आहे. टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत करते. केसांचे आरोग्य राखण्यासाठी केवळ मोरिंगा तेलच नाही तर मोरिंगा अर्क देखील फायदेशीर आहे.

- जीवनसत्त्वे आणि खनिजे: शेवग्यामध्ये जीवनसत्तवे अ, क, ई आणि विविध प्रकाचे बी जीवनसत्त्वे आढळतात. हे जीवनसत्त्वे टाळूचे पोषण करण्यास आणि केसांच्या कूपांच्या वाढीस तसंच केसांची पोत सुधारण्यास मदत करतात.
- अमिनो अॅसिड: मोरिंगामधील अमिनो अॅसिड जे प्रथिनांचे मुख्य घटक आहे. केसांच्या वाढीसाठी आणि केस मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे.
- अँटी-ऑक्सिडंट्स: मोरिंगामध्ये क्वेरसेटिन सारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे टाळूवरील ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव करतात. ज्यामुळे केसांची निरोगी वाढ होते.
- लोह आणि जस्त: मोरिंगामधील लोह आणि जस्त टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते. तसंच यामुळे केसांची वाढ जलद होते.
शेवग्याचे पाणी कसं तयार करावं
साहित्य
- 2-3 ताज्या किंवा वाळलेल्या शेवग्याच्या शेंगा
- 2-3 ग्लास पाणी
- कृती
- ताज्या किंवा वाढलेल्या शेवग्याच्या शेंगाचे व्यवस्थित लहान तुकडे करून घ्या
- आता एका पातील्यात पाणी घाला आणि ते उकळा
- पाणी उकळल्यानंतर त्यात शेंगांचे तुकडे घाला आणि 10 ते 15 मिनिटं उकळू द्या
- आता पाणी गाळून घ्या आणि थंड झालं की प्या.
- केसांच्या वाढीसाठी पाणी कसं प्यावं
- सर्वोत्तम परिणामांकरित तुम्ही शेवग्याचं पाणी सकाळी प्यावे
- दररोज किमान 1-2 कप पाणी प्या.
- चव वाढवण्यासाठी त्यात मध किंवा लिंबू घालू शकता
- शेवग्याच्या पाण्याचे इतर फायदे
- यात व्हिटॅमिन सी ची पातळी उच्च असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे उत्तम आहे
- हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते तसेच हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे
- यातील दाहक विरोधी गुणधर्म त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे
(अस्वीकरण: सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिली आहे. ईटीव्ही भारताबद्दल किंवा माहितीच्या वैज्ञानिक वैधतेबद्दल कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी, डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC8373516/