Drinking Water While Workout: फिट राहण्यासाठी बहुतांश लोक दररोज न चुकता वर्कआउट करण्यास प्राधान्य देतात. वर्कआउट करणं कित्येकांचा जगण्याचा भाग होत चालला आहे. वर्कआउटनंतर आपल्याला खूप घाम येतो. तसंच घसाही कोरडा होतो. यामुळे स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी बरेच जन वपर्कआउट नंतर लगेच थंड किंवा नॉर्मल पाणी पितात. परंतु, वर्कआउट नंतर लगेच पाणी पीणे चांगलं आहे काय? तसंच वर्कआउटनंतर थंड पाणी प्यावं की नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या बातमीत आम्ही तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं देणार आहोत.
एक्सपर्टनुसार वर्कआउनंतर स्वत:ला हायड्रेटेड ठेवणे फार गरजेचं आहे. कारण वर्कआउटमुळे निघालेल्या घामामुळे आपल्या शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्स नाहीसे होतात. यामुळे पाणी पिणं गरजेच असते. परंतु, वर्कआउनंतर लगेच थंड पाणी पिणं हानिकारक ठरू शकतं. कारण वर्कआउट केल्यामुळे शरीराचं तापमान वाढलेलं असतं. अशावेळी थंड पाणी पिल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो.
वर्कआउटनंतर थंड पाणी प्यायाल्यास होणारे तोटे: वर्कआउटनंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास शरीराचे तापमान कमी होवू शकते. यामुळे तुम्हाला सर्दी होण्याची दाट शक्यता असते. तसचं थंड पाणी प्यायल्यास वजन वाढू शकतं. त्यामुळे वर्कआउटनंतर नॉर्मल पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे वजन तर कमी होतेच शिवाय इतर संभाव्य धोकेही दूर होतात. वर्कआउनंतर लगेच पाणी प्यायल्यास हार्ट रेटवर देखील परिणाम होतो. कारण वर्कआउट केल्यामुळे ब्लड सर्कुलेशन वेगानं होत असते. अशातच थंड पाणी प्यायल्यास हृदयाची गति तसंच ब्लड सर्कुलेशन कमी होतं.
वर्कआउट करण्यापूर्वी किती आणि कसं पाणी प्यावं: नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीननुसार(एनएचआय) वर्कआउट सुरु करण्याच्या दोन तासापूर्वी 2 ते 3 कप पाणी प्यावं. तसंच वर्कआउटनंतर 20 मिनिटांनी 7 ते 10 औंस पाणी प्या. त्यानंतर 30 मिनिटांनी एका ठिकाणी आरामात बसून अर्धा लिटर पाणी घ्या. एकदाच जास्त पाणी पिण्याची घाई करु नका.
संदर्भ