Cucumber Juice Health Benefits: काकडीचा रस आरोग्यासाठी खूप चांगला आहे. यामुळे तुम्हाला बराच काळ भूक लागणार नाही. काकडीमध्ये मुबलक प्रमाणात असलेले पोषक तत्त्व शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. काकडी पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असल्यानं रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे चांगलं आहे. दररोज एक कप काकडीचा रस प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. काकडी जीवनसत्त्वे अ आणि क ने समृद्ध आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी डोकेदुखी आणि थकव्यासारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील हे एक उत्तम पेय आहे.

डॉ. श्रीलता यांच्या मते, उन्हाळ्यात दररोज काकडीच रस प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसंच उन्हाळ्यातील कडक तापमानात तुमचं शरीर थंड ठेवण्यासाठी हे एक चांगलं पेय आहे. यात 95 टक्के पाणी असते. जे हायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक आहे.

- काकडीचा रस पिण्याचे फायदे
- चांगले डिटॉक्स पेय: काकडीचा रस एक चांगला डिटॉक्स पेय म्हणून काम करतो. तुम्ही नियमित सकाळी हा रस प्यायल्यास शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर स्वच्छ करण्यासाठी आणि आजारांपासून संरक्षण करण्यासाठी नियमित काकडीचा रस पिण्याचा सल्ला तज्ञ देतात. तसंच दररोज काकडीचा रस प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. परिणामी वज झपाट्यानं कमी होते. तसंच पोटावरील चरबी सहज वितळते. जास्त वजन असलेल्यांसाठी काकडीचा रस खूप फायदेशीर आहे. असं आहारतज्ञ डॉ.श्रीलता यांचे म्हणणे आहे.
- रोगप्रतिकार शक्ती वाढवते: हे हायड्रेटिंग पेय आहे आणि त्यात कॅलरीज कमी आहेत. तसंच यात के आणि सी सह जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते निरोगी त्वचेला प्रोत्साहन देते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. काकडीच्या रसात बीटा-कॅरोटीन आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. यामुळे आतड्यांच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे.

- उष्णता कमी करते: काकडी उन्हापासून संरक्षण करते. काकडीमध्ये सुमारे 96 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात काकडीचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. काकडीतील मॅग्नेशियममुळे चांगली झोप येते. शरीराला खूप आराम मिळतो. याच्या मदतीने तुम्ही निद्रानाशाच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. त्यातील पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे आपल्या शरीरातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते. आपले हृदय निरोगी ठेवते. डॉ. श्रीलता म्हणतात की काकडीचा रस हृदयविकाराचा धोका देखील कमी करतो.
- कर्करोग रोखते: काकडीमध्ये क्युकरबिटासिन बी (CUB) नावाचे फायटोकेमिकल मोठ्या प्रमाणात असते. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. हे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते. काकडीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम असते. याचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. आरोग्य तज्ञ म्हणतात की ते हाडे मजबूत करते.
- पचन सुधारते: आधी सांगितल्याप्रमाणे, त्यात भरपूर पाणी असते. तसंच यात पुरेशा प्रमाणात फायबर देखील असते. हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. पचनासंबंधित समस्या कमी होतात. शिवाय, तज्ञांचे म्हणणे आहे की ते बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्यांपासून आराम देते.
- त्वचेचे आरोग्य: काकडीच्या रसात आढळणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि एमध्ये कोलेजन आणि जखमा बरे करण्याचे गुणधर्म असतात. अतिनील किरणांपासून संरक्षणासह, त्वचेच्या एकूण आरोग्यास मदत करतात.
- कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते: फायबरचे प्रमाण जास्त असलेल्या काकड्यांचे सेवन केल्याने २१ दिवसांनी एकूण कोलेस्टेरॉलची पातळी प्रभावीपणे कमी होते. तज्ञांचे म्हणणे आहे की काकडी कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार टाळण्यास मदत करतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4441156/