ETV Bharat / health-and-lifestyle

प्रथिनांची गरज भागवण्यासाठी दररोज किती अंडी खावी? जाणून घ्या अभ्यास काय म्हणतो - HOW MANY EGGS A DAY

नाश्त्यात दोन अंडी खाल्ल्याने प्रथिनांचा पाया मजबूत होतो. परंतु बहुतेक प्रौढांसाठी दैनंदिन प्रथिनांची गरजा पूर्ण होऊ शकते काय? वाचा सविस्तर..,

HOW MUCH PROTIN IN 2 EGGS  HOW MANY EGGS A DAY  HOW MUCH PROTEIN NEEDED FOR ADULT  PROTEIN INTAKE
दररोज किती अंडी खावी? (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : April 16, 2025 at 5:21 PM IST

Updated : April 16, 2025 at 5:27 PM IST

2 Min Read

How Many Eggs A Day: अंडी हे प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहेत. मानवी शरीराला आवश्यक असलेले सर्व नऊ अमीनो आम्लं अंड्यांमध्ये आढळतात. अंड्यांमध्ये आढळणारे इतर आवश्यक पोषक घटक, जसे की व्हिटॅमिन बी 12, रिबोफ्लेविन, सेलेनियम आणि कोलीन, मेंदूचे कार्य, चयापचय आणि एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याशिवाय, अंड्यांमध्ये निरोगी चरबी असते तसंच कॅलरीज देखील कमी असतात.

HOW MUCH PROTIN IN 2 EGGS  HOW MANY EGGS A DAY  HOW MUCH PROTEIN NEEDED FOR ADULT  PROTEIN INTAKE
दररोज किती अंडी खावी? (Getty Images)

जरी अंडी हे प्रथिनांचे मूलभूत स्रोत असले तरी, केवळ प्रथिनांसाठी अंडी खाल्ल्याने शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते, कारण त्यात फायबर, लोह आणि आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही दोन अंडी घेतली, ज्यामध्ये प्रत्येकी 6 ते 7 ग्रॅम प्रथिने असतात, तर तुम्हाला 12 ते 14 ग्रॅम प्रथिने मिळतात. मात्र, हे पुरेसे नाही. ते फक्त दैनंदिन प्रथिनांच्या गरजेच्या काही भागाची पूर्तता करते. सरासरी व्यक्तीला प्रति किलो वजनासाठी 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. उदाहरणार्थ, 70 किलो वजनाच्या व्यक्तीला किमान 56 ग्रॅम प्रथिने आवश्यक असते. ते अंड्यातून मिळत नाही.

  • एखाद्या व्यक्तीला किती प्रथिनांची आवश्यकता असते?: प्रथिनांची गरज व्यक्तीच्या जीवनशैलीनुसार बदलते. जे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय असतात किंवा ज्यांची उच्च चयापचय गरजा असतात त्यांना अधिक प्रथिनांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, खेळाडूंना प्रति किलोग्राम शरीराच्या वजनासाठी 1.2 ते 2.0 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात.

  • दोन अंडी खेळाडूसाठी पुरेशे आहेत काय? 70 किलो वजनाच्या खेळाडूला दररोज 84 ते 140 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असू शकते. अशा परिस्थितीत, दोन अंडी त्यांच्या प्रथिनांच्या गरजेचा फक्त एक छोटासा भाग पूर्ण करतात. अशावेळी, तुम्ही अंडी, मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ, शेंगा किंवा वनस्पती-आधारित प्रथिनयुक्त पदार्थांद्वारे तुमच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करू शकता. त्याशिवाय, तुम्हाला इतर पोषक तत्वे देखील मिळू शकतात. प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोट जास्त काळ भरलेले असते. हे भूक नियंत्रित करण्यास आणि जास्त खाण्यापासून रोखण्यास मदत करते. अंड्यांसह इतर उच्च-प्रथिनेयुक्त पदार्थ खाण्याची शिफारस वेळोवेळी डॉक्टर करतात. कारण प्रथिनेयुक्त पदार्थ पचन कमी करून आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर करून जास्त काळ पोट भरलेले ठेवतात.
  • नाश्त्यासाठी दोन अंडी पुरेशी आहेत का?: नाश्त्यासाठी दोन अंडी स्नायूंच्या चांगल्या देखभालीसाठी आणि उर्जेची पातळी राखण्यासाठी पुरेसे असू शकत नाही. प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी अंडी इतर प्रथिनयुक्त पदार्थांसोबत जसे की दही, चीज, संपूर्ण धान्य किंवा काजू एकत्र करणे चांगले. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांसह अंडी एकत्र केल्याने सतत ऊर्जा पातळी सुनिश्चित होते. यामुळे भूक कमी होते आणि एकूण स्नायूंच्या आरोग्यास समर्थन मिळते.
  • मात्र, अनेकांना भीती असते की दिवसातून दोन अंडी खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढेल. मात्र, जरी अंड्यांमध्ये चरबी असली, तरी अभ्यासात असे दिसून आले आहे की बहुतेक लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर त्यांचा फारसा परिणाम होत नाही. मधुमेह किंवा हृदयरोग यासारख्या विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी अंडी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इतरांसाठी, दररोज दोन ते तीन अंडी खाणे सुरक्षित आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC9316657/

हेही वाचा

Last Updated : April 16, 2025 at 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.