WHAT HABITS WEAKEN THE BRAIN: मेंदू हा एक असा अवयव आहे जो शारीरिकदृष्ट्या जितका जास्त वापरला जातो तितका तो अधिक मजबूत होतो. परंतु दैनंदिन जीवनातील काही सवयी मेंदूचे कार्य कमकुवत करू शकतात. त्याचा विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि संज्ञानात्मक कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. व्यायामाचा अभाव, डिहायड्रेशन, जास्त प्रमाणात मद्यपान, सतत नकारात्मक विचार आणि नैराश्य हे सर्व घटक स्मरणशक्तीवर परिणाम करतात. या व्यतिरिक्त, स्मरणशक्ती कमी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या इतर गोष्टी कोणत्या त्या पाहूया.
2013 मध्ये स्लीपमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, झोपेचा अभाव हे स्मरणशक्ती कमी होण्याचे एक महत्वाचं कारण आहे. आपण झोपतो तेव्हा मेंदू आठवणी साठवून ठेवतो. म्हणूनच, नवीन माहिती दीर्घकालीन स्मृतीत ठेवण्याकरिता झोप अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. परिणामी कमी झोपेमुळे ही प्रक्रिया बिघडू शकते आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते.
- जास्त ताण: जास्त ताण घेतल्यास हिप्पोकॅम्पसवर परिणाम होवू शकतो. हिप्पोकॅम्पसवर हा एक घटक आहे जो मेंदूला स्मृती निर्मिती आणि स्मृती पुनर्प्राप्तीमध्ये मदत करतो. सायकोन्यूरोएंडोक्राइनोलॉजीमधील संशोधनात असे आढळून आले आहे की दीर्घकालीन ताणामुळे हिप्पोकॅम्पसचे नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, जास्त ताणामुळे कोर्टिसोलची पातळी देखील वाढू शकते. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत अडथळा येऊ शकतो.
- खराब आहार: साखरेचे जास्त सेवन, प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स आणि अस्वास्थ्यकर चरबी असलेले खराब आहार संज्ञानात्मक कार्य आणि स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम करू शकते. खराब आहारामुळे जळजळ आणि इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो. यामुळे मेंदूचे कार्य बिघडते. मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या ओमेगा-3, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे संज्ञानात्मक घट होऊ शकते. यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, शिकण्याची गती कमी होऊ शकते आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते.
2018 मध्ये एन्व्हायर्नमेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्हजमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, झोपण्यापूर्वी जास्त स्क्रीन टाइम झोपेच्या गुणवत्तेत व्यत्यय आणू शकतो . दीर्घकाळ स्क्रीन वापरल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो आणि झोपेचा अभाव होऊ शकतो. यामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे लक्ष केंद्रित करणे देखील कठीण होईल.
- मल्टीटास्किंग: एकाच वेळी अनेक कामे नियमितपणे केल्याने मेंदूवर जास्त ताण येऊ शकतो. यामुळे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि मेंदूला माहिती योग्यरित्या प्रक्रिया करण्याची आणि साठवण्याची संधी नष्ट होऊ शकते. यामुळे संज्ञानात्मक प्रक्रिया मंदावू शकतात आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते.
- पाण्याची कमतरता: शरीराचे कार्य सुरळीत चालण्याकरिता पाणी आवश्यक आहे. शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास डिहाइड्रेशन होण्याची दाट शक्यता असते. यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच शिवाय स्मरणशक्ती देखील कमकुवत होऊ शकते. यामुळे नियमित तीन ते चार लिटर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)