ETV Bharat / health-and-lifestyle

रक्तातील साखर नियंत्रित करण्यापासून हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान आहे लवंग - BENEFITS OF CLOVES

Benefits Of Clove:आरोग्य तज्ञांच्या मते, नियमितपणे लवंगाचं सेवन केल्याने साखर नियंत्रित करण्यासोबतच विविध आरोग्य समस्या दूर करण्यासाठी लवंग उत्तम आहे.

CLOVES HEALTH BENEFITS  HEALTH BENEFITS EATING CLOVES DAILY  HEALTH BENEFITS OF CLOVES  BENEFITS OF EATING ONE CLOVE
लवंग खाण्याचे फायदे (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : April 22, 2025 at 8:39 PM IST

2 Min Read

Benefits Of Eating One Clove: लवंगाचा वापर केवळ मसाल्याच्या रूपातच केला जात नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. लवंगामध्ये युजेनॉल नावाचे संयुग असते. सोबतच दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात. निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून आपल्या दैनंदिन आहारात लवंगाचा समावेश केल्याने अनेक फायदे मिळू शकतात. तिखट सुगंध आणि तिखट चव असलेल्या लवंगाचे सेवन सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्यापणे फायदेशीर आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्येही लवंगाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती उपलब्ध आहे.

CLOVES HEALTH BENEFITS  HEALTH BENEFITS EATING CLOVES DAILY  HEALTH BENEFITS OF CLOVES  BENEFITS OF EATING ONE CLOVE
लवंग खाण्याचे फायदे (Getty Images)

आयुर्वेदानुसार, लवंग हा एक असा मसाला आहे ज्याचे सेवन केल्याने केवळ भूकच वाढत नाही तर पचनाच्या समस्या, मूत्र विकार, कफ पित्ताशी संबंधित विकार, दात आणि हिरड्यांच्या समस्या आणि पुरुषांमधील पुरुषत्वाशी संबंधित समस्यामध्येही आराम मिळतो.

भोपालचे आयुर्वेदिक वैद्य डॉ. राजेश शर्मा याच्या मते, योग्य प्रमाणात लवंगाचे सेवन केल्याने आरोग्यविषयक अनेक समस्या टळू शकतात.लवंग खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंतु लवंगाचे सेवन करताना त्याचे प्रमाण लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण त्याच्या जास्त सेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

  • दररोज एक लवंग खाण्याचे फायदे
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: लवंगामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच ते शरीराला बळकटी देण्यास मदत करते. तसंच संक्रमणांशी लढण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी लवंग घालून उकळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.
  • तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले: लवंगामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात. हे तोंडाचे आरोग्य सुधारतात. लवंगाचे नियमित सेवन केल्याने दातदुखी कमी होते. लवंग केवळ हिरड्यांचा त्रास कमी करत नाही तर तोंडाची दुर्गंधी देखील रोखते. तज्ञांचे म्हणणे आहे की हे तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्यास देखील ते मदत करते.

  • पचनासाठी उत्कृष्ट: लवंगामध्ये नैसर्गिक पाचक गुणधर्म आढळतात, जे पचनाला चालना देतात. लवंग खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी आवश्यक असलेल्या एंजाइम्सचे उत्पादन उत्तेजित करते. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधरते. बीएमसी कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन अँड थेरपीज या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे, की दररोज लवंगाचे सेवन केल्याने पचनसंबंधित सर्व समस्या दूर होवू शकतात.
  • साखर नियंत्रणासाठी चांगले: डायबिटीज रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, लवंगातील युजेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे संयुगे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात. तसंच हे ग्लुकोजचे शोषण कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. NIH च्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, मधुमेह असलेल्या लोकांसाठी दररोज लवंग खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.
  • यकृताचे कार्य सुधारते: लवंगातील युजेनॉल यकृतामध्ये जमा झालेली चरबी आणि विषारी पदार्थ काढून टाकून यकृताचे कार्य सुधारते. NIH च्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, लवंग यकृताचे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करते.

  • हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले: लवंगाचे नियमित सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तसंच हृदयरोगापासून संरक्षण होते. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि निरोगी रक्ताभिसरण वाढविण्यास मदत करते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://www.health.harvard.edu/blog/spice-up-your-holidays-with-brain-healthy-seasonings-2016120710734

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6503551/

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4285960/

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.