Foods That Help Reduce Stress: मानसिक आरोग्य समस्यांना तोंड देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चिंता आणि तणावासारख्या मानसिक समस्यांमधून गेले नसलेले लोक क्वचितच मिळतील. आपल्या देशातील अंदाजे 56 दशलक्ष लोक मानिसक आजारानी ग्रसलेले आहेत. म्हणून, शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचेही रक्षण करणे महत्त्वाचे आहे. मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी, हार्मोन्स संतुलित करण्यासाठी आणि चिंता कमी करण्यासाठी तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया कोणते पदार्थ चिंता कमी करण्यास मदत करतात?
- चरबीयुक्त मासे: चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे मेंदूच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास आणि तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी कमी करण्यास मदत करतात. जर्नल ऑफ क्लिनिकल सायकियाट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सूचित करण्यात आलं आहे की, सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या न्यूरोट्रांसमीटरच्या कार्याला समर्थन दिल्यास चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणून, तुमच्या आहारात सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल सारख्या माशांचा आहारात समावेश करा.
- पालेभाज्या: पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम आणि फोलेट पुरेशा प्रमाणात आढळते. मज्जातंतूंच्या कार्यात मॅग्नेशियम महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून, नियमितपणे पालेभाज्या खाल्ल्याने चिंतेची लक्षणे कमी होण्यास मदत होते. सायकोसोमॅटिक मेडिसिनमधील एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, मॅग्नेशियमची कमतरता चिंतेची पातळी वाढवू शकते.
- ब्लूबेरी: ब्लूबेरी हे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचे भांडार आहे. हे मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव करण्याचं काम आणि चिंता तसंच तणावाचा सामना करण्यासाठी देखील ते फायदेशीर आहे. ब्लूबेरीमध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स मूड सुधारण्यास आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकतात, असं फ्रंटियर्स इन सायकॉलॉजीमधील एका अभ्यासात आढळून आलं आहे.
- दही: दह्यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स मानसिक आरोग्य राखण्यास आणि चिंता कमी करण्यासाठी उत्तम आहेत. प्रोबायोटिक्स आतड्यांतील बॅक्टेरिया संतुलित करण्यास देखील मदत करू शकतात, जे सेरोटोनिन सारख्या न्यूरोट्रांसमीटरच्या उत्पादनावर परिणाम करतात.
- एवोकॅडो: एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, फोलेट, जीवनसत्त्वे बी, बी६ आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सूचित केले आहे की ते मेंदूचे कार्य सुधारण्यास आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकते. मूड नियंत्रित करण्यासाठी देखील एवोकॅडो फायदेशीर आहे.
- डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेट हे मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्रोत आहे. हे तणाव संप्रेरकांची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. द जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजीमधील एका संशोधनामध्ये आढळलं आहे की, नियमित डॉर्क चॉकलेट्स खाल्ल्यास चिंता नियंत्रित करण्यास आणि तणाव कमी करण्यासाठी मदत होते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)