ETV Bharat / health-and-lifestyle
जेवणानंतर बडीशेप खावी की नाही? वाचा संशोधन काय म्हणतो
बडीशेप खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बडीशेप फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबरनं समृद्ध आहे. परंतु जेवणानंतर बडीशेप खावी की नाही? जाणून घ्या तज्ञांचे मत

Published : February 11, 2025 at 1:56 PM IST
Saunf Benefits: जेवणानंतर बडीशेप खाणं सर्वांना आवडते. एक चमचा बडीशेप चघळल्यानं लाळेचा स्त्राव वाढतो. हीच लाळ पचनास देखील मदत करते. तोंडीची दुर्गंधी दूर करण्यास बडीशेफ फायदेशीर आहे. फास्ट फूड, तळलेले अन्न आणि इतर तेलकट पदार्थ खाल्ल्यानं अनेकांना पचनासंबंधित समस्यांना तोंड द्यावं लागते. मुखवास म्हणून चघळल्या जाणाऱ्या बडीशेपचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बडीशेपमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी बडीशेफ उत्तम आहे. तसंच यात असलेले लैक्टोजेनिक गुणधर्म आईचे दुध वाढवण्यास मदत करतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील बडीशेप फायदेशीर आहे.
'एव्हिडन्स-बेस्ड कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०१७ च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यास लोकांमध्ये पोटदुखी आणि अपचनाची लक्षणं कमी झाल्याचे जाणवले. लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. एस.के. सिंग यांनी या संशोधनात भाग घेतला. त्यांच्या मते, बडीशेपमधील पाचक रस अन्न योग्यरित्या पचवण्यासाठी प्रभावीपणे काम करतात.
- अशाप्रकारे बडीशेप खाल्ल्यास अधिक फायदेशीर
- बडीशेप पाणी: ज्यांना बडीशेप चघळणं आवडवत नाही. त्यांनी बडीशेप पाणी प्यावं. एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप मिसळा आणि 12 ते 15 मिनिटांनी प्या. हे अनपचन आम्लपिताची समस्या दूर करते. जेवणाच्या अर्धातास आधी किंवा नंतर हे पाणी पिल्यान पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे पोटातील पेटके कमी होतात. तसंच हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून देखील काम करू शकते.
- बडीशेप चहा: काही लोकांना सकाळी आणि दुपारच्या जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. अशा लोकांसाठी बडीशेप चहा हा एक चांगला पर्याय आहे. या चहाचे खूप आरोग्यदायी फायदे आहेत. २ ग्लास पाण्यात १ चमचा बडीशेप घाला आणि १ ग्लास पाणी चांगले उकळवा. हवं असल्यास आलं घालू शकता. नंतर ते गाळून त्यात मध घाला. रात्री झोपण्यापूर्वी पिण्याची सवय लावणे चांगले. या चहामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप येते.
- मधासह बडीशेप: पचनासंबंधित गंभीर समस्या असलेल्यांसाठी बेडीशेप मधासह खाणं खूप फायदेशीर मानलं जाते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो. बडीशेपमध्ये मिसळल्यास त्याचे फायदे आणखी वाढतात. प्रथम, तुम्ही एक चमचा बडीशेप चांगले बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा मध घाला. जेवणानंतर हे मिश्रण सेवन केल्याने पचनाच्या दीर्घकालीन समस्येपासून आराम मिळतो.
- बडीशेप खाण्याचे फायदे
- चयापचय सुधारते: बडीशेपमध्ये फेनसोनस, एस्ट्राकोल, ऍनेथोल सारखे नैसर्गिक तेल असते. जे चयापचय सुधारण्यास उत्तम आहे. तसंच यात पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात.
- बीपी नियंत्रण: उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बडीशेप फायदेशीर आहे. बडीशेपमधील पोटॅशियम आणि कॅल्शियम घटक हे उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगलं आहे.
- त्वचेच्या आरोग्यासाठी चांगलं: बडीशेपमुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात. परिणामी, हे लवकर वृद्धत्व टाळू शकतं असं म्हटलं जातं.
- वजन कमी करण्यासाठी चांगलं: बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उकडून पिल्यास वजन नियंत्रणात राहते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

