ETV Bharat / health-and-lifestyle

हृदयविकार ते कर्करोगापासून बचाव करण्यासाठी 'काळी द्राक्षे' फायदेशीर

फळं खाण्याचे आरोग्यविषयक अनेक फायदे आहेत. त्यातही हंगामी फळं खाणं आरोग्यासाठी उत्तम आहेत. काळी द्राक्षे खाल्ल्यास हृदयविकार तसंच कर्करोगापासून बचाव होतो.

BLACK GRAPES BENEFITS  BLACK GRAPES GOOD FOR HEART  ARE GRAPES GOOD FOR YOUR HEART
काळी द्राक्षे (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : January 29, 2025 at 1:25 PM IST

|

Updated : January 29, 2025 at 2:40 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

Black Grapes Benefits: निरोगी राहण्यासाठी डॉक्टर फळं खाण्याचा सल्ला देतात. कारण फळांमध्ये अनेक आरोग्यवर्धक पोषक तत्त्वे आढळतात. त्यातही हंगामी फळं खाल्ल्यास शरीरासाठी अधिकच चांगलं. सध्या हिवाळा सुरू आहे. बाजारात काळी द्राक्षे मुबलक प्रमाणत उपलब्ध आहेत. काळ्या द्राक्षांच्या सेवनानं कॅन्सर आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, त्यात रेझवेराट्रोल, फ्लेव्होनॉइड्स आणि अँथोसायनिन्स सारखे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे रक्त गोठण्यापासून वाचवतात. चला तर पाहू यात काळी द्राक्षे खाण्याचे फायदे.

  • हृदयाच्या समस्या: तज्ज्ञांच्या मते, काळ्या द्राक्षांमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसंच यात आढळणाऱ्या फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉलमुळे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होते. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. एका संशोधनात आढळून आलं की काळ्या आणि लाल द्राक्षांच्या सालीमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेले गुणधर्म आहेत. 2018 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात "काळ्या द्राक्षाच्या अर्काचा वापर सूज कमी करण्यासाठी आणि निरोगी प्रौढांमध्ये हृदय तसंच रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे," असं स्पष्ट झालं आहे.
  • अल्झायमर प्रतिबंध: काळ्या द्राक्षांतील रेसवटॉल अल्झायमर रोगाची वाढ कमी करण्यास मदत करू शकते. तसंच स्मृती आणि मेंदूचे कार्य सुधारते.
  • त्वचा: यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं.
  • कर्करोग कमी होण्याची शक्यता: संशोधनातून असं समोर आलं आहे की, त्यात मुबलक प्रमाणात असलेले रेसवटॉल कर्करोगाची वाढ कमी करते. तसंच 50 वर्षांवरील लोकांनी दोन आठवडे दररोज द्राक्षे खाल्यास कोलन कर्करोगाचा धोका कमी होतो.
  • बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाशी लढा: तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, रेसवटॉल आणि टेरोस्टिलबेन लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत करतात. त्याचबरोबर द्राक्षांमधील फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळते.
  • हाडांची मजबूती: द्राक्षांमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यातील व्हिटॅमिन ए रोग प्रतिकारशक्ती वाढवते. तसंच पेशींच्या वाढीसाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी काळी द्राक्षे फायदेशीर आहेत. आजारातून लवकर बरे होण्यासाठी देखील द्राक्षे महत्त्वाची भूमिका बजावतात.
  • पौष्टिक: काळी द्राक्षे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यात ८२% पाणी असल्याचे स्पष्ट झालं आहे. तसंच यात 31 कॅलरीज, 8 ग्रॅम कर्बोदके, 7 ग्रॅम शर्करा असते . त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, के, मॅग्नेशियम, तांबे आणि कॅल्शियम भरपूर असल्याचेही स्पष्ट झालं आहे. जे निरोगी राहिण्यासाठी चांगलं आहे.
  • महत्त्वाचं: तज्ज्ञांनी जास्त प्रमाणात काळी द्राक्षे न खाण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: ज्यांना रक्तस्त्रावाची समस्या आहे आणि जे शस्त्रक्रियेची तयारी करत आहेत त्यांना सेवन मर्यादित करण्याचा सल्ला दिला जातो.
Last Updated : January 29, 2025 at 2:40 PM IST