ETV Bharat / health-and-lifestyle
संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी जेवण केल्यास हृदयरोगांसह ‘या’ समस्या होतात दूर
आपण पौष्टीक आहार घेतला तरी तो योग्य वेळी खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण उशीरा जेवण केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात असं तज्ञांचं म्हणणं आहे.

Published : October 13, 2025 at 1:56 PM IST
Benefits Of Early Dinner : रात्रीचं जेवण लवकर करणं खूप महत्त्वाचे आहे. यामुळे पचनसंस्था तर सुधारतेच शिवाय आरोग्यविषयक अनेक समस्या टाळण्यासही मदत होते. काही लोक संध्याकाळी 7 वाजता जेवण करण्यास प्राधान्य देतात तर काही काही लोक उशिरा जेवतात. सात किंवा आठ वाजेपर्यंत जेवण करणं चांगलं आहे. परंतु तज्ञांचं असं म्हणणं आहे की, रात्री 9 वाजता जेवण केल्यास स्ट्रोक आणि हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा आपण नियमित आठ वाजता जेण करतो तेव्हा हृदरोग होण्याची शक्यता 28 टक्के कमी असते. असं सुचवलं जातं, की नियमितपणे रात्रीचे जेवण लवकर खाल्ल्याने आपण निरोगी राहतो आणि झोपेच्या समस्या टाळण्यास मदत होते. वृशाली शुक्ला यांनी त्यांच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात त्यांनी रात्रीचं जेवण लवकर करण्याच्या फायद्याबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या मते, नियमित लवकर जेवण केल्यास वजन देखील सहजपणे नियंत्रित करता येऊ शकते. चला तर 7 वाजता जेवण उरकल्यास आरोग्यदायी कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
पचनाच्या समस्या दूर: तज्ञाचं म्हणणं आहे की, रात्रीचे जेवण लवकर केल्यास पचनासंबंधित समस्या दूर होतात. सूर्यास्तानंतर जेवण केल्यास पचनक्रिया मंदावते. म्हणून सूर्यास्तापूर्वी जेणन करणं कधीही योग्य आहे. यामुळे पोटफुगी आणि गॅस सारख्या समस्या टाळता येतात. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना संध्याकाळी ७ वाजता जेवण्याची सवय लावण्याचा सल्ला दिला जात. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर लवकरच नियंत्रण करता येऊ. शकते. तज्ञांचं म्हणणं आहे की, लवकर जेवण्याची सवय लावणे चांगले आहे कारण ते पचनाच्या समस्या कमी करते. यामुळे आरोग्य सुरळीत राहतो.

झोपेच्या समस्या दूर: त्याचप्रमाणे, असं म्हटलं जातं की, जे लोक झोपण्यापूर्वी किमान ३ ते ४ तास आधी रात्रीचे जेवण पूर्ण करतात त्यांना चांगली झोप लागते. तसंच यामुळ निद्रानाशाची समस्या दूर होते. जेवण लवकर पचते. परिणामी यामुळे गॅस आणि आम्लता टाळता येते. असं म्हटलं जातं की, संध्याकाळी 7 वाजता जेवण पूर्ण केल्यास सकाळी पोट पूर्णपणे साफ होण्यास देखील मदत होते. ज्यांना नियमितपणे झोपेच्या समस्या येतात त्यांनी त्यांचे रात्रीचे जेवण लवकर पूर्ण करावं.

मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, जास्त वजन कमी: रात्रीचे जेवण लवकर केल्याने कोलेस्टेरॉल आणि वजन कमी होते असं म्हटलं जातं, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि साखरेसारख्या समस्या आपोआप टाळता येतात. ज्यांना भविष्यात आरोग्यविषयक समस्या येऊ नयेत याची काळजी घ्यायची आहे, त्यांना रात्रीचे जेवण लवकर पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे भविष्यात अनेक धोकादायक समस्या टाळता येतील, असं म्हटलं जातं.

मानसिक समस्या दूर: असं म्हटलं जातं की, जे लोक लवकर जेवण करतात त्यांना आराम आणि हलके वाटते, ज्यामुळे ताण कमी होतो आणि मानसिक समस्यांपासून मुक्तता मिळते. जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असता तेव्हा तुम्ही आपोआप निरोगी राहता. म्हणून, लवकर जेवण करण्याची सवय लावा.

सकाळी उत्साही: रात्री उशिरा जेवणाऱ्या लोकांना सकाळी आळशीपणा जाणवतो. कारण उशिरा खाल्लेले अन्न उशिरा पचते आणि त्यामुळे आतड्याची हालचाल व्यवस्थित होत नाही. या सर्वांमुळे संपूर्ण शरीर थकल्यासारखे वाटते. दुसरीकडे, जर तुम्ही लवकर जेवण केले तर खाल्लेलं अन्न लवकर पचते आणि सकाळी आतड्याची हालचाल सुरळीत होते. यामुळे दिवसभर तुम्हाला योग्य आणि उत्साही वाटते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

