ETV Bharat / health-and-lifestyle
'ही' फळं खा, फॅटी लिव्हरच्या समस्येपासून करा सुटका
यकृताच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि फॅटी लिव्हरचा धोका टाळण्यासाठी आहारात कोणती फळे समाविष्ट करावीत ते पाहूया

Published : February 14, 2025 at 5:05 PM IST
Fruits That Prevent Fatty Liver: शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी यकृत महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळे यकृताचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. शरीराला आवश्यक पोषक घटक पुरण्यापासून ते रक्ततातील साखरेची पातळी राखण्यापर्यंत सर्व महत्त्वाची कामं यकृत करते. परंतु दिवसेंदिवस फॅटी लिव्हरची समस्या वाढत आहे. फॅटी लिव्हर म्हणजे यकृताच्या पेशींमध्ये यकृताच्या वजनाच्या 5 टक्क्यापेक्षा जास्त चरबी जमा होणे होय. यकृतामध्ये चरबी जमा झाल्यामुळे आणि यकृताला सूज आल्यानं फॅटी लिव्हर होऊ शकते. चरबी वाढल्यामुळे यकृताच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. परंतु काही फळांच्या नियमित सेवनानं तुम्ही फॅटी लिव्हची समस्या दूर करू शकता. चला तर जाणून घेऊया यकृताचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी कोणती फळं आहेत फायदेशीर.
- फॅटी लिव्हरचे प्रकार
अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असे दोन फॅटी लिव्हरचे प्रकार आहेत. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे ही एक अशी स्थिती आहे. ज्यामध्ये अल्कोहोलच्या अतिसेवनानं यकृतावर चरबी जमा होते. याचे इतरही कारण अशू शकतात परंतु मुख्यता अल्कोहोलमुळे अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.
- बेरीज: बेरीज हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहेत. फूड अँड फंक्शनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार यकृताची जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी बेरी खाणं चांगलं आहे. बेरी खाल्ल्यानं यकृताचं नुकसान होण्यापासून संरक्षण करता येवू शकते. बेरीजमध्ये यकृताच्या एकूण आरोग्याला आधार देण्याची क्षमता देखील आहे. यामुळे तुम्ही तुमच्या आहारात ब्लूबेरी, स्टॉबेरी आणि ब्लॅकबेरींचा समावेश करू शकता.
- द्राक्षे: द्राक्षांमधील अँटीऑक्सिडंट्स यकृतातील जमा चरबी कमी करण्यासाठी द्राक्षे खाणं उपयुक्त आहे. त्यातील नारिंगेनिन आणि नारिंगिन हे संयुगे जळजळ कमी करण्यास आणि यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करू शकतात.
- सफरचंद: सफरचंद हे फायबरने समृद्ध फळ आहे. हे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि यकृतावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. सफरचंदांमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स यकृताची जळजळ कमी करण्यास देखील मदत करू शकतात. ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून आणि चयापचय प्रक्रिया सुधारून फॅटी लिव्हरचा धोका कमी करण्यासाठी सफरचंद देखील प्रभावी आहेत.
- अॅव्होकॅडो: अॅव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. द जर्नल ऑफ क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, हे सर्व यकृतावरील चरबी आणि जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. एवोकॅडोमध्ये ग्लूटाथिओन देखील असते, जो एक अँटीऑक्सिडंट आहे. हा यकृताला विषमुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी नियमितपणे अॅव्होकाडो खाणं चांगलं.
- अननस: अननसात व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होण्यास मदत होते. अननसाचे दाहक-विरोधी गुणधर्म यकृताची जळजळ रोखू शकतात आणि यकृताचे कार्य सुधारू शकतात, असं तज्ञांचं म्हणणं आहे.
- लिंबूवर्गीय फळं: लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सीने समृद्ध आहेत. हे यकृताच्या विषारी पदार्थ काढून टाकण्याच्या प्रक्रियेत मदत करतात आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह ताण आणि फॅटी लिव्हर रोग कमी करण्यासाठी लिंबूवर्गीय फळं खाणं देखील चांगलं आहे. हे यकृताच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास देखील मदत करू शकते. ज्यामध्ये नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा समावेश आहे.
- पपई: पपईमध्ये बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि लायकोपीनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. जे फॅटी लिव्हरपासून संरक्षण करण्यात मदत करतात. पपईमध्ये ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि जळजळ कमी करण्याची क्षमता आहे. यकृताच्या पुनरुत्पादनास चालना देण्यासाठी पपई खाणं फायदेशीर आहे.
- डाळिंब: डाळिंबातील पॉलीफेनॉल यकृताच्या आरोग्याचे रक्षण करण्यास मदत करतात. तसंच हे यकृतामध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. यामुळे यकृताची जळजळ कमी होते तसंच यकृत विषमुक्त करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसंच डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स यकृताच्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण देखील कमी करतात.
- टरबूज: टरबूजमध्ये लायकोपिन सारखे अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे यकृताची जळजळ आणि चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी होते. टरबूजमध्ये भरपूर पाणी असल्याने ते विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

