ETV Bharat / entertainment

'झापुक झुपूक' चित्रपट प्रेक्षक पाहात असताना अचानक सूरजची चित्रपटगृहामध्ये झाली एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल... - ZAPUK ZUPUK MOVIE

सूरज चव्हाण स्टारर 'झापुक झुपूक' चित्रपट अनेकांना आवडत आहे. चित्रपटगृहामध्ये प्रेक्षक चित्रपट पाहात असताना सूरजनं अचानक तिथे पोहोचून प्रत्येकाला आश्चर्यचकित केलं.

zapuk zupuk movie
'झापुक झुपूक' चित्रपट (zapuk zupuk movie poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 30, 2025 at 12:05 PM IST

2 Min Read

मुंबई - 'बिग बॉस मराठी 5' फेम सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर सूरजचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सूरजला मिळालेल्या यशाबरोबर त्याला अनेकदा ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले आहे. यानंतर देखील त्यानं मेहनत करणं सोडलं नाही, तो सतत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परिश्रम करताना दिसला. सूरज हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, नुकताच सूरजनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या चाहत्यांबरोबर बोलताना दिसत आहे. सूरज हा 'झापुक झुपूक' चित्रपट सुरू असताना एल्प्रो चिंचवडमधील चित्रपटगृहामध्ये गेला होता.

सूरज चव्हाणचा व्हिडिओ व्हायरल : त्याला यावेळी लोकांनी खूप प्रेम दिलं. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक लहान मुलगा म्हणतो, "मी तुम्हाला भेटून खूप आश्चर्यचकित झालो आहे. मी बिग बॉस मराठी पाहायचो." तसेच दुसऱ्या एका मुलीनं म्हटलं, "मी तुमचा चित्रपट आज दुसऱ्यांदा पाहायला आले आहे." याशिवाय या चित्रपटगृहामध्ये सूरजनं धमाकेदार डान्स करत लोकांचं खूप मनोरंजन केलं. दरम्यान या व्हिडिओच्या कॅप्शन पोस्टमध्ये सूरजनं लिहिलं, 'एल्प्रो चिंचवडच्या थेटरात आज आपल्या पिक्चरच्या प्रेक्षकांना भेटायला गेलतो… मला जी नावं ठेवत्यात, आमच्या पिक्चरचे, जे नको नको ती व्हिडिओ टाकत्यात त्या पेक्षा, जी माझी लोक माझ्यावर प्रेम करत्यात ती माझ्यासाठी लई म्हंजी, लई म्हंजी, लई जास्त महत्वाची ह्यात…! आणि त्यांच्यासाठी मी आयुष्यभर मेहनत करणार आणि तुम्हाला मी हसावणार, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत असचं राहुद्या- तुमचाच सूरज." आता सूरजनं त्याला ट्रोल करत असलेल्यांना चांगलचं उत्तर दिल आहे.

सूरज चव्हाणचं केलं चाहत्यांनी कौतुक : तसेच व्हिडिओच्या कमेंट विभागात एक चाहत्यांनं लिहिलं, 'खूप छान प्रकारे पिक्चर बनवला आहे, सुरज चव्हाणची अ‍ॅक्टींग आवडली.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'सुरजनं पैसा कमी आणि माणसे जास्त कमवली.' आणखी दुसऱ्या एकानं लिहिलं, 'एल्प्रो मॉलला चित्रपट पाहत असताना अचानक थेटरमध्ये सूरज चव्हाणची एन्ट्री झाली, हे पाहून माझा विश्र्वासच बसत नव्हता की, मी सूरज चव्हाणला अगदी समोरून पाहतेय आणि आम्ही सर्वांनी त्यांच्याबरोबर 'झापुक झुपूक' डान्स पण केला.' याशिवाय अनेकजण सूरजच्या या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

'झापुक झुपूक' चित्रपटातील 'वाजीव दादा' गाण्यावर सूरज चव्हाण - जान्हवी किल्लेकरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल...

सूरज चव्हाणला दिला रितेश देशमुखनं सल्ला, व्हिडिओ व्हायरल

सूरज चव्हाण स्टारर 'झापुक झुपूक' चित्रपटामधील दुसरं गाणं 'पोराचा बाजार उठला रं' रिलीज, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.