ETV Bharat / entertainment

2025च्या मेट गालामध्ये शाहरुख खान पदार्पण करेल?, चाहते आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात पाहण्यासाठी उत्सुक... - MET GALA 2025

शाहरुख खान हा मेट गालामध्ये पदार्पण करू शकतो. आता याबद्दल सोशल मीडियावर एका पोस्टमुळे चर्चा होताना दिसत आहेत.

Shah rukh khan
शाहरुख खान (शाहरुख खान (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 11, 2025 at 12:07 PM IST

2 Min Read

मुंबई : दरवर्षी, फॅशन जगत सर्वात प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस कार्यक्रम, द मेट गाला हा एक चर्चेचा विषय बनत असतो. या कार्यक्रमाची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षांत अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी या आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवर आपले वर्चस्व गाजवले आहे. प्रियांका चोप्रा, आलिया भट्टपासून ते दीपिका पदुकोण आणि ईशा अंबानीपर्यंत, सर्वांनी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन केलंय. आता असं ऐकण्यात येत आहे की, कदाचित शाहरुख खान यावर्षी मेट गालामध्ये पदार्पण करू शकतो. आता ही बातमी ऐकल्यानंतर अनेकजण उत्साहित आहेत. तसेच चित्रपट असो किंवा कार्यक्रम, शाहरुखला त्याच्या चाहत्यांची मनं कशी जिंकायची हे चांगलेच माहिती आहे.

शाहरुख मेट गालामध्ये पदार्पण करेल का? : प्रसिद्ध फॅशन वर्ल्ड इव्हेंट मेट गाला 2025बद्दल चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरू झाली आहेत. आता एका फॅशन अकाउंटवरील इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'त्यांच्या क्षेत्रातील दोन बॉलिवूड दिग्गज आणि दुसरा आमच्या पिढीतील सर्वात मोठा डिझायनर, मेट गाला 2025 पदार्पणासाठी एकत्र येत आहेत. इतिहास घडणार आहे.' ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये अंदाज लावण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमात कुठले स्टार जाईल, याबद्दल चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अनेक चाहते आता बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा विचार करत आहे.

किंग खानचं झालं कौतुक : एका चाहत्यानं लिहिलं व्हायरल झालेल्या पोस्टवर लिहिलं,'शाहरुख एक्स सब्या , काय गोष्ट आहे, मला विश्वासच बसत नाहीये.' दुसऱ्यानं लिहिलं, 'शाहरुख आणि सब्यसाची जबरदस्त असेल.' तिसऱ्यानं लिहिलं, 'स्पष्टपणे तो शाहरुख आहे आणि फॅशन किंग सब्या आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'बॉलिवूडमधील जबरदस्त स्टार 'शाहरुख खान आहे.' तसेच आई होणारी कियारा अडवाणी देखील या प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटमध्ये दिसणार आहे. मेट गाला कार्यक्रम 5 मे 2025 रोजी न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये होणार आहे. दरम्यान शाहरुखच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'किंग' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याची मुलगी सुहाना खान देखील असणार आहे. 'किंग' चित्रपटामध्ये शाहरुखचा वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि सुहाना व्यतिरिक्त अभय वर्मा आणि अभिषेक बच्चन असणार आहेत.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोण नाही तर 'ही' पंजाबी अभिनेत्री शाहरुख खानच्या 'किंग'चा भाग असेल...
  2. क्रिकेट कार्निव्हल सुरु...! विराटसह रिंकू सिंगचा IPL 2025 उद्घाटन समारंभात शाहरुखसोबत डान्स; पाहा व्हिडिओ
  3. आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्कच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख खानची स्टायलिश एंट्री...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.