हैदराबाद: ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा भारतातील तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबाद शहरात आयोजित करण्यात आली आहे. ६ मेपासून सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये जगभरातील १०९ सुंदरी पोहोचल्या आहेत. मिस वर्ल्ड २०२५ चा अंतिम सामना ३१ मे रोजी पार पडेल आणि जगाच्या नव्या विश्वसुंदरीला मिस वर्ल्डचा मुकुट घातला जाईल. दरम्यान, ही स्पर्धा पहिल्यांदा कधी सुरू झाली, तिचे संस्थापक कोण आहेत, पहिली विश्वसुंदरी कोण होती यासह अनेक रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
जगात मिस वर्ल्ड स्पर्धा कोणी सुरू केली? - वर्षानुवर्षे ही स्पर्धा जगभरातील देशांच्या सुंदरींमध्ये होत आली आहे, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ही स्पर्धा एरिक मक्का या एका पुरुषानं सुरू केली होती. एरिक मक्का हे पब्लिसिटी सेल्स मॅनेजर होते आणि त्यांनी फेस्टिव्हल ऑफ ग्रेट ब्रिटेनच्या आयोजकांनी ही कल्पना सूचवली. परंतु सुरुवातीला या फेस्टिव्हलला 'फेस्टिव्हल ऑफ ग्रेट ब्रिटन गर्ल बिकिनी कॉम्पिटिशन' असं नाव देण्यात आलं. या महोत्सवाचा उद्देश बिकीनी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा होता. पण यामुळे वाद निर्माण झाला आणि अखेर याचं नाव बदलून 'मिस वर्ल्ड' करण्यात आलं. अशा तऱ्हेनं नं १९५१ मध्ये युनायटेड किंग्डममध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा पहिल्यांदा सुरू झाली.

- २००० मध्ये एरिक मोर्ले यांचं निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी ज्युलिया यांनी त्यांच्या जागी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद भूषवलं.
पहिली मिस वर्ल्ड कोण बनली? - केर्स्टिन मार्गरेटा 'किकी' हाकनसन (२३ जुलै १९२९ - ४ नोव्हेंबर २०२४) ही स्वीडीश सुंदरी पहिली मिस वर्ल्ड बनली. ती एक मॉडेल आणि ब्युटी क्वीन होती.१९५१ मध्ये एरिक मोर्ले यांनी स्थापन केलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेची ती पहिली विजेती ठरली. तिनं जेव्हा पहिल्यांदा मिस स्वीडन वर्ल्ड हा किताब मिळवला तेव्हा हाकनसन एक फोटोग्राफर आणि फॅशन मॉडेल होती. नंतर तिनं लंडनमधील स्पर्धाही जिंकली.

- हाकनसनला जेव्हा मुकुट परिधान केला जात होता तेव्हा तिनं बिकीनी घातली होती. त्यामुळं तत्कालिन पोपकडून निषेध करण्यात आला आणि त्यांनंतर अनेक देशांनी पोपच्या या भूकेचं समर्थन केलं. परिणामी १९५२ मध्ये या स्पर्धेत बिकीनीवर बंदी घालण्यात आली आणि त्याऐवजी स्विमवेअरचा वापर करण्यात आला. हाकनसन मुकुट परिधान करताना बिकीनी परिधान करणारी ती एकमेव विजेती ठरली.
भारतातील या सौंदर्यवतींना मिळाला आहे मिस वर्ल्डचा किताब - मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचा गौरवशाली इतिहास राहीला आहे. भारतीय सुंदरींनी सहावेळा मिस वर्ल्डचा किताब जिंकला आहे. सर्वात पहिल्यांदा १९६६ मध्ये रीता फारियाला मिस वर्ल्डचा किताब मिळाला. त्यानंतर २८ वर्षाच्या कालावधीनंतर भारताला १९९४ मध्ये पुन्हा एकदा विजेतेपद मिळालं. त्यावेळी ऐश्वर्या रायनं हा मुकुट परिधान केला होता. त्यानंतर भारतानं १९९७, १९९९, २००० आणि २०१७ मध्ये विश्वसुंदरीचा किताब आपल्या नावावर केला.
- रीता फारिया (१९६६)
- ऐश्वर्या राय (१९९४)
- डायना हेडन (१९९७)
- युक्ता मुखी (१९९९)
- प्रियांका चोप्रा (२०००)
- मानुषी छिल्लर (२०१७)

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनचं चॅरिटी कार्य - आज मिस वर्ल्ड ही एक स्पर्धा जगातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक मानली जाते. १९५१ मध्ये सुरू झाल्यापासून मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशननं मुलांच्या धर्मादाय संस्थांसाठी १ अब्ज पौंडांपेक्षा जास्त निधी उभारला आहे. या संघटनेच्या वतीनं अपंग आणि वंचित मुलांना मदत केली जाते. मिस वर्ल्डच्या १०० हून अधिक देशांमध्ये फ्रँचायझी आहेत.
हेही वाचा -