ETV Bharat / entertainment

कर्नाटकातील मराठी भाषिकांना न्याय कधी मिळणार? पाहा 'फॉलोअर्स'चा संवेदनशील ट्रेलर - MAHARASHTRA KARNATAKA BORDER ISSUE

महाराष्ट्रच्या सीमेलगत राहणाऱ्या कर्नाटकातील मराठी भाषिकांची अनेक कारणानं मुस्कटदाबी होतेय. याचं वास्तव मांडणारा 'फॉलोअर' हा प्रभावी चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. याचा ट्रेलर पाहू शकता.

trailer of 'Follower'
'फॉलोअर्स'चा ट्रेलर ('Follower' poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : March 10, 2025 at 7:41 PM IST

1 Min Read

सीमाभागातील मराठी-कन्नड भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर आधारित आणि तीन मित्रांच्या नाट्यमय प्रवासाची कहाणी सांगणाऱ्या 'फॉलोअर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. अत्यंत उत्कंठावर्धक आणि प्रभावी आशय असलेल्या या चित्रपटाच्या कथेचा गाभा बेळगाव शहरातील मराठी-कन्नड वादाच्या भोवती गुंफलेला आहे. या संघर्षाने प्रभावित असलेल्या एका पत्रकाराची यात कथा आहे, जो समाजातील अन्याय उघड करण्यासाठी लढा देतो. कट्टर विचारसरणीच्या पत्रकाराच्या संघर्षाची कथा असलेल्या या चित्रपटात एक तरल प्रेमकहाणी असून, बाप-लेकाचे इमोशनल नाते आणि इतर अनेक भावनिक पदरही उलगडले जातात.

'फॉलोअर' हा चित्रपट ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने साकारला आहे. या चित्रपटाचे निर्माते विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र आणि हर्षद नलावडे आहेत. तसेच राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम यांनी सहनिर्मितीची जबाबदारी उचलली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांनी केले असून, प्रमुख भूमिकांमध्ये रघु बसरीमारद, डोना मुन्शी आणि हर्षद नलावडे असून त्यांच्यासोबत नवोदित कलाकार झळकत आहेत.

trailer of 'Follower'
'फॉलोअर्स'चा संवेदनशील ट्रेलर (trailer of 'Follower')

या चित्रपटाचे छायांकन साकेत ग्यानी यांनी तर संकलन मौलिक शर्मा यांनी केले आहे. चित्रपटातील गीते सम्यक सिंग यांनी लिहिली असून, त्यांना अभिज्ञान अरोरा यांच्या साथीने संगीतबद्ध करण्यात आले आहे. मराठी, कन्नड आणि हिंदी भाषांत याची निर्मिती करण्यात आली असून 'फॉलोअर' हा चित्रपट वेगळ्या विषयामुळे विषेश लक्ष वेधून घेईल अशी आशा निर्माते व्यक्त करतात. ते पुढे सांगतात की उत्कट मांडणी, नव्या दमाचे कलाकार आणि खिळवून ठेवणारा आशय यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर वेगळा अनुभव देईल. आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवांकित झालेला 'फॉलोअर' हा सिनेमा येत्या २१ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.