ETV Bharat / entertainment

तमन्ना भाटिया स्टारर 'अरनमनाई 4'मधील विजय वर्मानं केलं पोस्टर शेअर - vijay varma share post

Vijay Varma-Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया अभिनीत 'अरनमनाई 4' चित्रपटामधील विजय वर्मानं एक पोस्टर शेअर केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घालत आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 6:16 PM IST

Vijay Varma-Tamannaah Bhatia
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया ((instagram))

मुंबई Vijay Varma-Tamannaah Bhatia : अभिनेता विजय वर्मा त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री तमन्ना भाटिया अनेकदा त्याला सपोर्ट करताना दिसते. हे जोडपे अनेकदा एकमेकांबरोबर वेगवेगळ्या पार्ट्यांत आणि कार्यक्रमात एकत्र दिसतात. नुकताच तमन्ना स्टारर 'अरनमनई 4' रिलीज झाला. या चित्रपटासाठी विजय वर्मानं तमन्नाचे खूप कौतुक केले. याशिवाय त्यानं इंस्टाग्राम स्टोरीजवर तमन्नाच्या 'अरनमनई 4' चित्रपटामधील एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये तमन्ना ही हातात समई घेतलेली दिसत आहे. याशिवाय ती साडी नेसून आहे. ही पोस्ट शेअर करताना विजयनं लिहिलं, "अभिनंदन सुंदर काम करत राहा."

तमन्ना भाटिया स्टारर 'अरनमनई 4' चित्रपट : तमन्नाचा नवीन रिलीज चित्रपट 'अरनमनई 4' हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तिचा हा चित्रपट अनेकांना आवडत आहे. 'अरनमनई 4' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सुंदर सी यांनी केलं आहे. या चित्रपटाला अवनी सिनेमॅक्सच्या बॅनरखाली निर्मित केलं गेलं आहे. 'अरनमनई 4' मध्ये सुंदर सी, तमन्ना भाटिया, राशी खन्ना, संतोष प्रताप, रामचंद्र राजू, कोवई सरला, योगी बाबू, केएस रविकुमार, जयप्रकाश, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश, राजेंद्रन आणि सिंगमपुली हे कलाकार आहेत. 'अरनमनई 4' चित्रपट फ्रँचायझीमधील हा चौथा चित्रपट आहे. आता या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा आहेत.

विजय वर्मा त्याची गर्लफ्रेंड तमन्ना भाटिया : विजय आणि तमन्ना अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तमन्नानं गेल्या वर्षी जूनमध्ये एका मुलाखतीत विजयबरोबरच्या नात्याची पुष्टी केली होती. तेव्हापासून ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट करतात. दोघेही खूपदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. गेल्या वर्षी मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझाच्या लाँचिंग निमित्त आयोजित न्यू ऑर्डर ऑफ स्टाईल शोकेसमध्ये त्यांनी अब्राहम आणि ठाकोरसाठी एकत्र रॅम्प केला होता. अलीकडेच दोघांनी 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर हे जोडपे प्रचंड चर्चेत आले होते.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहाबरोबर अयान मुखर्जी झाला स्पॉट - ayan mukerji spotted with raha
  2. 'ॲनिमल'मधील 'जमाल कुडू' गाण्यावर बॉबी देओलची स्टेप 32 वर्षांपूर्वी करण्यात आली, पाहा कोणी केली - rekha dance
  3. करण जोहर निर्मित, वरुण धवन स्टारर चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'चं शूटिंग सुरू - sanskari ki tulsi kumari Movie

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.