मुंबई - के-पॉप स्टार आणि बीटीएस (BTS) बॅन्ड सदस्य किम तेह्युंग उर्फ व्ही आणि किम नाम-जून उर्फ आरएम यांनी १८ महिने दक्षिण कोरियातील अनिवार्य सैन्य सेवा पूर्ण केली आहे. आता या दोघांनी आपली मिलिट्री सर्विस पूर्ण केल्यानंतर जगभरातील त्यांचे चाहते आनंदी आहेत. के-पॉप जगतील सदस्य किम तेह्युंग आणि किम नामजून यांना १० जून रोजी अधिकृतपणे डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जियोन जंग-कूक उर्फ जंगकूक आणि पार्क जी-मिन उर्फ जिमिन यांना ११ जून रोजी डिस्चार्ज देण्यात देणार आहे. तसेच २१ मिन योंगी उर्फ सुगा हा आपली सैन्य सेवा पूर्ण करणार आहे. दरम्यान यापूर्वी किम सेओक-जिनला १२ जून २०२४ रोजी दक्षिण कोरियाच्या सैन्यातून निवृत्त करण्यात आले. यानंतर जंग होसेक उर्फ जे-होपला १७ ऑक्टोबर २०२४ रोजी निवृत्त करण्यात आलं होतं. दोन्ही सदस्य सैन्यातून परतल्यानंतर त्याच्या वैयक्तिक प्रोजेक्ट्समध्ये सक्रिय आहेत.
व्ही आणि आरएम मिलिट्री सर्विस पूर्ण केली : दीड वर्षांहून अधिक काळानंतर सर्व सात सदस्य पहिल्यांदाच २१ जूननंतर एकत्र येणार आहेत. आता सोशल मीडियावर व्ही आणि आरएमचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये दोघेही फोटोसाठी सुंदर पोझ देताना दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरएम हा सॅक्सोफोन वाजवताना दिसत असून व्हीच्या हातात पुष्पगुच्छ असल्याचे दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सैन्य सेवा पूर्ण केल्यानंतर दोन्ही सदस्य खुश असल्याचे दिसत आहेत. याशिवाय काही व्हिडिओमध्ये व्ही आणि आरएम दोघेही मजेदार गोष्टी देखील करत असल्याचे दिसत आहेत.
Omg the energy! Our boys are out!! pic.twitter.com/PljtVYczGo
— 마이타네 ⁷ 愛 ⟭⟬E ARE B⟬⟭CK (@miu__von) June 10, 2025
RM on Instagram
— BTS Charts & Translations (@charts_k) June 10, 2025
2023.12.11 ~ 2025.6.10 🇰🇷 pic.twitter.com/qGqBorX5hn
V stories:
2023 12.11 2025 06.10
Thank you ARMY for waiting for me 🙇🏻
Heh pic.twitter.com/6zG2HhY1sA
BTS IS BACK~💜
— Hallie | 𝐅𝐄𝐒𝐓⟭⟬⁷ (@j1nzhu0o_) June 6, 2025
Wow so much support for BTS on their military comeback. So happy to see BTS everywhere to welcome them back!🥹💜 pic.twitter.com/aUnaTyJGW4
📸 PHOTO
— BTS News & Updates (@dalbitbangtan) June 10, 2025
Our favorite snapshots of @BTS_twt RM & V today 🥹🫶💜 pic.twitter.com/V4ez9LCnEx
व्ही आणि आरएमनं व्यक्त केल्या भावना : दरम्यान अनेक ठिकाणी चाहत्यांनी बीटीएसच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यासाठी बॅनर आणि पोस्टर्स लावले आहेत. मंगळवारी,दक्षिण कोरियातील सियोलमध्ये चाहते व्ही आणि आरएम मिलिट्री सर्विसमधून बाहेर पडल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी आले आहेत. दरम्यान मिलिट्री सर्विस पूर्व केल्यानंतर व्हीनं पत्रकारांना सांगितलं की, "माझ्यासाठी माझे शरीर आणि मन दोन्ही पुनर्संचयित करण्याची आणि पुनर्बांधणी करण्याची वेळ होती." आता मी ते केले आहे, मला खरोखर शक्य तितक्या लवकर थेट माझ्या बीटीएस आर्मीला भेटायचं आहे." यानंतर व्हीला पत्रकारांनी डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला काय करायचे आहे असं विचारले, "परफॉर्म करेल." असं त्यानं सांगितलं. दरम्यान आरएम त्याच्या भावना व्यक्त करत म्हटलं, "अनेक कठीण आणि वेदनादायक क्षण आले. पण माझ्या सेवेदरम्यान, मला खरोखर जाणवलं की आमच्या जागी किती लोक देशाचे रक्षण करत आहेत." याशिवाय जिमिन आणि जंगकूक यांना बुधवारी डिस्चार्ज होणार असल्यानं बीटीएस लवकरच पुन्हा एकत्र येईल. २१ जून रोजी डिस्चार्ज होणारा सुगा हा शेवटचा बीटीएस सदस्य असेल.
हेही वाचा :