मुंबई - Box Office Collection : अभिनेता अजय देवगण स्टारर 'और में कहाँ दम था' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, यामध्ये तो पुन्हा एकदा तब्बूबरोबर दिसला. या ऑनस्क्रीन जोडीनं आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, मात्र यावेळी त्यांची जादू प्रेक्षकांमध्ये फिकी पडताना दिसत आहे. दुसरीकडे जान्हवी कपूर स्टारर 'उलझ' हा चित्रपटही थिएटरमध्ये दाखल झाला. 2 ऑगस्ट रोजी या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. आता या दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. आता कुठल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याबद्दल जाणून घेऊया...
'और में कहाँ दम था'चं ओपनिंग कलेक्शन : अजय देवगण आणि तब्बू यांच्या 'औरों में कहाँ दम था'बद्दल बोलायचं झालं तर,या चित्रपटाचं ओपनिंग खूपच निराशाजक राहिलं. बॉक्स ऑफिसवर आलेले आकडे खूपच धक्कादायक आहेत, कारण अजय देवगणच्या या चित्रपटाला 16 वर्षांतील सर्वात वाईट ओपनिंग मिळाली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'और में कौन दम था'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 2 कोटीची कमाई केली आहे. आता हा चित्रपट शनिवार आणि रविवारी चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. निरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटाचं बजेट जवळपास 140 कोटी रुपये आहे. याआधी अजयचा 'मैदान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटानं देखील रिलीजच्या पहिल्या दिवशी 7 कोटीचा टप्पा गाठला होता.
'उलझ'चं ओपनिंग कलेक्शन : जान्हवी कपूर आणि गुलशन देवय्या स्टारर 'उलझ' हा चित्रपट प्रेक्षकांवर काही विशेष जादू करू शकला नाही. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.16 कोटीची कमाई केली आहे. शुक्रवारी 'उलझ'चा एकूण हिंदीमधील ऑक्युपेंसी रेट 13.02% होता. मॉर्निंग शोची व्याप्ती 7.38%, दुपारच्या शोची व्याप्ती 10.85%, संध्याकाळच्या शोची व्याप्ती 13.06% आणि रात्रीच्या शोची व्याप्ती 20.78% होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधांशू सारी यांनी केलंय. या चित्रपटाकडून जान्हवी कपूरला खूप अपेक्षा होती.
हेही वाचा :