मुंबई : ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्माती संध्या सूरी यांचा 'संतोष' चित्रपट युनायटेड किंगडमनं ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवला होता. हा चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये देखील होता. आता या चित्रपटाबद्दल एक माहिती समोर आली आहे. भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)नं बंदी घातली आहे. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटात दाखवलेल्या काही संवेदनशील मुद्द्यांवर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणात कट्स करण्याची मागणी केली गेली आहे. 'संतोष' या चित्रपटामध्ये महिलांशी संबंधित गंभीर मुद्दे दाखविण्यात आले आहेत.
'संतोष' चित्रपटावर भारतात बंदी ? : तसेच चित्रपटामध्ये, इस्लामोफोबिया आणि पोलिसांविरुद्ध हिंसाचार यासारखे विषय मांडण्यात आले आहेत. आता या चित्रपटामधील काही दृश्य सेन्सॉर बोर्डाला खडकले आहेत. 'संतोश' चित्रपटाबद्दल दिग्दर्शक संध्या सूरी यांनी म्हटलं आहे की, "सेन्सॉर बोर्डानं इतक्या मोठ्या प्रमाणात आणि व्यापक कट्सची यादी पाठवली आहे की, ती लागू करणे जवळपास शक्य नाही. इतके कट्स केल्यानंतर चित्रपटाची मूळ कहाणी ही पूर्णपणे बदलून जाईल. या चित्रपटामधून, जो संदेश द्यायचा आहे, तो आम्ही देऊ शकणार नाही." 'संतोष' चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलचं कौतुक झालं आहे. आता हा चित्रपट भारतातील प्रेक्षक पाहू शकणार नाही. या चित्रपटाची कहाणी खूप दमदार आहे.
'संतोष' चित्रपटाला दिलं प्रेक्षकांनी समर्थन : 'संतोष' चित्रपटाला भारतात बंदी सेन्सॉर बोर्डाचा घातल्यामुळे अनेकजण नाराज आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री शाहाना गोस्वामीनं प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील शाहाना गोस्वामीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. आता 'संतोष' चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अनेकांनी संध्या सूरी आणि चित्रपटाच्या टीमला समर्थन दिलं आहे. आता या चित्रपटाबद्दल सेन्सॉर बोर्डाचा अंतिम निर्णय काय असेल , हे लक्षणीय ठरणार आहे. हा चित्रपट भारतात रिलीज होऊ शकेल की नाही, याबद्दल काहीही स्पष्ट झालेलं नाही.