ETV Bharat / entertainment

सई ताम्हणकर आणि इम्रान हाश्मी स्टारर सत्यकथेवर आधारित 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर रिलीज - GROUND ZERO TRAILER REKEASE

तेजस देवस्कर दिग्दर्शित 'ग्राउंड झिरो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बीएसएफच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम ऑपरेशन्सपैकी एक असलेल्या मोहीमेची सत्यकथा यामध्ये दाखवण्यात आली आहे.

GROUND ZERO TRAILER REKEASE
'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर रिलीज (GROUND ZERO poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 7, 2025 at 4:09 PM IST

2 Min Read

मुंबई - काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि इथं राहणारे सर्व भारतीय हे आपले आहेत. त्याचं संरक्षण झालं पाहिजे या भावनेनं अनेक लष्करी मोहीमा इथं पार पडल्या. यामध्ये लोकांच्या नजरेपासून दूर राहिलेल्या राहिलेल्या एका अकथित लढाईचं चित्रण असलेल्या खऱ्या घटनेवर आधारित 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. 25 एप्रिल रोजी रिलीज होत असलेल्या या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

कसा आहे 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर? - चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात 2001 मधील काश्मीरातील एका घटनेनं होते. 'दगड फेकण्याचे दिवस संपले आहेत, आता खरा आवाज करायचा असेल तर पिस्तुल चालवलं पाहिजे', असा दहशतवादी संदेश ऐकायला मिळतो. त्यानंतर पिस्तुलधारी दहशतवादी भारतीय सैनिकावर गोळी झाडतात. 'फौजी इथं मरण्यासाठीच आलेत आणि यांचा बदला घेतला जाईल', अशी वाक्य भिंतीवर झळकतात. दोन आठवड्यामध्ये 70 जवानांना वीरमरण येतं. या स्थितीवर ताबा मिळवण्यासाठी बीएसएफ जवानांची तुकडी दाखल होते. बीएसएफचे डेप्युटी कमांडंट नरेंद्र नाथ दुबे या तुकडीचं नेतृत्व करतात आणि गाजी नावाच्या एका चेहरा नसलेल्या दहशतवाद्याच्या विरोधात मोहीम उघडतात. काश्मीरी तरुणांच्या हातात शस्त्र नाही तर 'पेन पेन्सिल ब्रश' पाहिजे यासाठी डेप्युटी कमांडंट नरेंद्र नाथ दुबे जागृती मोहीम उघडतात. या तरुणांना अटक करुन नाही तर त्यांच्या हातून बंदूक सोडवण्यात खरा पराक्रम असल्याचं मानणाऱ्या नरेंद्र नाथ दुबेंच्या पराक्रमाची गाथा या चित्रपटातून उलगडणार आहे.

'ग्राउंड झिरो' हा चित्रपट येत्या 25 एप्रिल 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हे या ट्रेलरवरुन स्पष्ट झालंय. 'ग्राउंड झिरो' चित्रपटामध्ये इमरान हाश्मी एका दमदार भूमिकेत दिसत आहे. नरेंद्र नाथ दुबे यांचं मिशन हे बीएसएफच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम ऑपरेशन्सपैकी एक मानलं जातं. 2003 मध्ये दहशतवादी प्रमुख गाजी बाबा ठार मारणाऱ्या ऑपरेशनचं नेतृत्व दुबे यांनी केलं होतं. त्यांना 2005 मध्ये अब्दुल कलाम यांनी कीर्ती चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात आलं होतं. 'ग्राउंड झिरो' चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देवस्कर यांनी केलं आहे. या चित्रपटात केवळ अ‍ॅक्शन नाही तर इमोशनल सीन्सही पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कहाणी फक्त युद्धभूमीपुरती मर्यादित नाही तर सीमेवर तैनात असलेल्या आपल्या सैनिकांनी दिलेल्या वैयक्तिक बलिदानाचेही प्रदर्शन करेल.

'ग्राउंड झिरो' चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करण्यात आली असून तेजस देवस्कर यांनी याचं दिग्दर्शन केलंय. 'लक्ष्य' चित्रपटसारखा उत्तम चित्रपट देणाऱ्या निर्मात्यांनी बनवलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळाल्यानं इमरान हाश्मी समाधानी आहे. या चित्रपटामध्ये सई ताम्हणकर, मुकेश तिवारी, झोया हुसेन, ललित प्रभाकर आणि एकलव्य तोमर हे कलाकार झळखणार आहेत.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.