ETV Bharat / entertainment

शान आणि अवधूत गुप्ते यांच्या सशक्त आवाजाने सजलेले 'बंजारा'मधील 'होऊया रिचार्ज' गाणे प्रदर्शित! - FILM BANJARA HOOYA RECHARGE SONG

'बंजारा' चित्रपटातील 'होऊया रिचार्ज' गाण्याला अवधूत गुप्तेंनी संगीतबद्दल केलंय. गुरु ठाकूर लिखीत या गाण्याला शान आणि अवधूत गुप्तेंनी स्वरसाज चढवला असून हे गाणं रिलीज झालंय.

film Banjara Hooya Recharge song
बंजारामधील होऊया रिचार्ज गाणं (Banjara Hooya Recharge song)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 26, 2025 at 7:35 PM IST

1 Min Read

मुंबई - मैत्री ही सर्व रिलेशनशिप्समध्ये वरच्या स्थानावर असते. अर्थात मैत्रीची अनेक रूपं असून प्रत्येकाच्या जीवनात मैत्री महत्वाची भूमिका बजावत असते. चित्रपटांतूनही मैत्रीचं उदात्त हेतू अधोरेखित होत असतात. आगामी मराठी चित्रपट 'बंजारा' मित्र, मैत्री आणि 'रोड ट्रिप'वर आधारित असून त्यातील एक गाणे, 'होऊया रिचार्ज', नुकतेच प्रदर्शित झालं असून त्यातही मैत्री ओतप्रोत भरलेली दिसते. हे गाणे केवळ मैत्रीची आठवण करून देत नाही तर रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढायला देखील प्रेरित करतं. दृश्य आणि संगीत यांच्या समन्वयातून, 'होऊया रिचार्ज' प्रेक्षकांच्या मनाचा ताजातवाना श्वास बनतो.

मैत्री, प्रवास आणि आत्मशोध यांचा सुरेख मिलाफ असलेल्या या चित्रपटातील 'होऊया रिचार्ज' हे प्रेरणादायी गाणे नुकतेच प्रदर्शित झालं आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक शान आणि अवधूत गुप्ते यांच्या सशक्त आवाजानं सजलेल्या या गाण्याला गुरू ठाकूर यांच्या अर्थपूर्ण शब्दांची आणि अवधूत गुप्ते यांच्या ऊर्जा देणाऱ्या संगीताची साथ लाभली आहे. स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज या तरुण कलाकारांवर चित्रित झालेल्या या गाण्यात, बाइकवरून चाललेला त्यांचा आनंदी प्रवास, मनोहारी निसर्गाच्या साक्षीने खुलून येतो.

Banjara Hooya Recharge song
बंजारामधील होऊया रिचार्ज गाणं (Banjara Hooya Recharge song)

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणाला की, "आपल्या दैनंदिन जीवनात आपण स्वतःशी संवाद साधायला विसरतो, तेच आम्ही या गाण्यातून दाखवायचा प्रयत्न केला आहे. आम्ही प्रत्येक फ्रेममध्ये ती जिवंत सफर टिपली आहे."

प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणाले की, "‘होऊया रिचार्ज’ हे गाणं ऐकताना प्रेक्षकांना आपले जुने मित्र, गमतीदार सहली, आणि थोडेसे हरवलेले आनंदाचे क्षण आठवतील. हा चित्रपट आणि हे गाणं आयुष्यातल्या त्या अंतःप्रवासाची आठवण करून देतो, जिथे प्रत्येकजण स्वतःचा शोध घेत असतो."

'बंजारा' चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज हे कलाकार या चित्रपटात असून याची निर्मिती केली आहे रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांनी तर प्रस्तुतकर्ता आहे शरद पोंक्षे. वी. एस. प्रॉडक्शन्स निर्मित आणि मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'बंजारा' हा 'रोड ट्रिप' चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.