ETV Bharat / entertainment

तब्बल ३८ वर्षानंतर श्रीनगरमध्ये पार पडला बॉलिवूड फिल्मचा प्रीमियर, वाचा या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरलेल्या सई ताम्हणकरचं मनोगत! - GROUND ZERO SRINAGAR PREMIERE

'ग्राउंड झीरो' या चित्रपटाचा विशेष प्रीमियर श्रीनगरमध्ये पार पडला. या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरलेल्या सई ताम्हणकरनं याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलंय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 19, 2025 at 7:28 PM IST

2 Min Read

मुंबई - तेलस देओस्कर यांनी दिग्दर्शित केलेला 'ग्राउंड झीरो' हा चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या चित्रपटाचा विशेष प्रीमियर श्रीनगरमध्ये पार पडला. याशोसाठी अभिनेता इम्रान हाश्मी, सई ताम्हणकरसह निर्माता फरहान अख्तर आणि चित्रपटातील संपूर्ण टीम हजर होती. मराठमोळ्या सईसाठी हा प्रसंग संस्मरणीय ठरणारा होता. या प्रीमियरविषयी आणि चित्रपटातील भूमिकेविषयी तिनं ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी खास बातचीत केली आहे.

ग्राउंड झीरो'चित्रपटाच्या प्रीमियरनंतर सई ताम्हणकर म्हणाली, " 'ग्राउंड झीरो' हा चित्रपट इम्रान हाश्मी आणि माझ्या सहअभिनयाने सजलेला आहे. प्रेक्षकांना आमची ही फ्रेश जोडी प्रथमच बघायला मिळणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटची निर्मिती आणि तेजस देऊस्करचं ताकदीचं दिग्दर्शन या चित्रपटाला एक वेगळीच उंची देतात. श्रीनगरमध्ये 'ग्राउंड झीरो' या माझ्या नव्या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर झाला आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा मी एक भाग ठरले, ही गोष्ट आजही माझ्या मनात घर करून बसली आहे. हा अनुभव केवळ एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक भारतीय म्हणूनही अत्यंत विशेष होता."

Ground Zero Srinagar premiere
'ग्राउंड झीरो' टीमसह सई ताम्हणकर (Etv Bharat)

चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना सई म्हणाली, "या चित्रपटासाठी मी साकारलेली भूमिका, बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची, माझ्यासाठी खूप भावनिक आणि आव्हानात्मक होती. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून मला एक वेगळी बाजू साकारता आली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही मी मनापासून पार पाडली."

श्रीनगरमध्ये बॉलिवूड चित्रपटाचं ३८ वर्षानंतर पहिल्यांदाच स्क्रिनिंग पार पडलं. याविषयी बोलताना सई पुढं म्हणाली, श्रीनगरमध्ये पार पडलेलं रेड कार्पेट स्क्रीनिंग म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतला एक ऐतिहासिक क्षण होता. गेल्या ३८ वर्षांत अशा प्रकारचं स्क्रीनिंग इथे झालं नव्हतं. या प्रसंगी माझ्यासोबत इम्रान, निर्माता फरहान अख्तर आणि चित्रपटातील संपूर्ण टीम हजर होती. हा क्षण माझ्या करिअरमधील एक अमूल्य ठेवा ठरला आहे. त्या दिवशी मी माझ्या लूकसाठी खास लाल रंगाचा सलवार सूट निवडला होता जो त्या वातावरणात अगदी योग्य वाटला. मी माझ्या सोशल मीडियावर त्या क्षणांचे काही खास फोटो शेअर केले आहेत, जे मला कायमच आठवणीत ठेवावेसे वाटतील."

सई ताम्हणकर आणि ग्राउंड झीरो' चित्रपटाची टीम देशभर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरत आहे. यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत असल्याचं सांगत सई पुढं म्हणाली, "सध्या सोशल मीडियावर मला मिळणारा प्रतिसाद पाहून मी भारावून जातेय. अभिनय हा माझ्यासाठी एक साधना आहे आणि प्रत्येक नव्या प्रोजेक्टसह मी स्वतःला नव्याने सादर करण्याचा प्रयत्न करत असते. 'ग्राउंड झीरो' नंतरही मी काही खास आणि आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहो, हीच अपेक्षा."

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.