ETV Bharat / entertainment

रणबीर कपूर स्टारर 'रामायण'च्या चित्रपटाचा फर्स्ट लूक ९ शहरांमध्ये लॉन्च होणार, कधी आणि कुठे जाणून घ्या...

'रामायण'च्या पहिल्या झलकानं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांना आश्चर्यचकित केलं आहे. आता ही झलक प्रेक्षकांसाठी कधी प्रदर्शित होईल हे जाणून घ्या.

Ramayana movie
रामायण चित्रपट (रणबीर कपूरच्या चित्रपटाचा पहिला लूक ९ शहरांमध्ये लॉन्च होईल (चित्रपटाचे पोस्टर्स))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : July 2, 2025 at 1:58 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'रामायण'बद्दल आता एक अपडेट समोर आली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश अभिनीत चित्रपटाची पहिली ३ मिनिटांची झलक काही खास लोकांसाठी प्रदर्शित करण्यात आली. आता हीच झलक चित्रपटाचे निर्माते प्रेक्षकांसाठी लवकरत शेअर करणार आहे. 'रामायण'ची पहिली झलक कधी येणार याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श, ज्यांना पहिल्या झलकचा तसेच ७ मिनिटांच्या स्पेशल विजन शोरीलचा एक्सक्लूसिव प्रीव्यू मिळाला आहे, ते आता त्यांचा उत्साह थांबवू शकले नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, 'जय श्री राम... बहुप्रतीक्षित महाकाव्य 'रामायणा'ची पहिली झलक आणि ७ मिनिटांच्या स्पेशल विजन शोरील नुकताच पाहिला. त्याची झलक खूपच रोमांचक आहे, 'रामायण' हा फक्त आजच्यासाठी चित्रपट नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे... बॉक्स ऑफिसवर एक वादळ येत आहे.'

'रामायण: पार्ट १'बद्दल अपडेट : आदर्श यांच्या एका पोस्टनं आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, चाहते आता २०२६च्या दिवाळीची वाट पाहात आहेत. दरम्यान या चित्रपटाची पहिली झलक ही ३ जुलै रोजी देशातील ९ शहरांमध्ये दाखविण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई , दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि कोची यांचा समावेश आहे. याशिवाय 'रामायण पार्ट १' २०२६ च्या दिवाळीच्या आसपास प्रदर्शित होईल. तसेच चित्रपटाचा दुसरा भाग २०२७च्या दिवाळीच्या आसपास प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

'रामायण: पार्ट १' चित्रपटाबद्दल : दरम्यान या चित्रपटाच्या पहिल्या भागचे शूटिंग हे पूर्ण झालं आहे. तसेच दुसऱ्या भागाचे शूटिंग हे ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. दरम्यान रॅप इव्हेंटमध्ये रणबीर भावूक झाल्याचा दिसला. त्यानं यावेळी एक हृदयस्पर्शी भाषण दिलं. त्यानं आपल्या भाषणात म्हटलं की, श्रीरामाची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची आहे. याशिवाय रणबीरनं यावेळी साई पल्लवी, यश , रवी दुबे आणि संपूर्ण टिमचं आभार मानलं. कार्यक्रमात रणबीर आणि रवी दुबे हे मीठी मारताना दिसले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रणबीरनं श्रीरामच्या भूमिकेसाठी अनेक महिने तयारी केली, मांसाहार आणि मद्यपान सोडले, याशिवाय त्यानं शारीरिक प्रशिक्षण घेतलं आणि धनुर्विद्या देखील शिकली. या चित्रपटामध्ये रणबीर हा श्रीरामाच्या भूमिकेत असून साई पल्लवी सीतामाता, यश रावणा, सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय चित्रपटात लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग आणि काजल अग्रवाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये असणार आहेत.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर स्टारर 'रामायणा'ची अधिकृत घोषणा, 2026, 2027 च्या दिवाळीत होणार रिलीज
  2. 'रामायण'साठी रणबीर कपूरचा रामाचा लूक ठरला