मुंबई : अभिजीत सावंतचा आवाज हा अनेकांना खूप सुंदर वाटतो. आता हा गायक त्याच्या चाहत्यांसाठी एक सुंदर गाणं घेऊन येत आहे. बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शो मधून पुन्हा एकदा अभिजीतनं प्रेक्षकांच्या मनात एक घर केलं आहे. बिग बॉसनंतर अभिजीत काय नवीन काम करणार याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. यापूर्वी त्यानं अभिनयाची आवड असल्याचं देखील सांगितलं होतं. आता अभिजीतनं अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर त्याच्या आगामी गाण्याबद्दल सांगितलं आहे. या गाण्याचं नाव 'चाल तुरु तुरु' असून येत्या २ मे २०२५ रोजी, हे खास गाणं रिलीज होणार आहे. या गाण्यामध्ये आता काहीतरी नवीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अभिजीत सावंत घेऊन येणार नवीन गाणं : 'चाल तुरु तुरु' या जुन्या गाण्याचं खास नवीन व्हर्जन अभिजीत तयार करत आहे. आता अभिजीतचं रिलीज होणार हे गाणं अनेकजण पाहण्यासाठी आतुर आहेत. दरम्यान अभिजीतनं शेअर केलेल्या व्हिडिओच्या पोस्टवर लिहिलं, 'त्या सुरांमध्ये लपलेली एक नवी कहाणी… लवकरच!' आता अभिनजीतच्या या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'मी तुझं गाणं रिलीज होण्याची वाट पाहात आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मोहब्बतें लुटौंगा' माझं आवडत गाणं आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'खूप छान अभी दादा मी तर खूप आतुर आहे लवकर ऐकायला.' याशिवाय अनेजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून अभिजीतवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
'इंडियन आयडॉल'मुळे अभिजीत सावंतचं आयुष्य बदललं : २०२५ वर्ष अभिजीत सावंतसाठी खूप विशेष आहे. दरम्यान 'बिग बॉस मराठी ५'मध्ये देखील अभिजीननं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं. अनेकांना त्याचा स्वभाव आवडला होता. दरम्यान अभिजीत हा २००४ मध्ये प्रसारित झालेला शो 'इंडियन आयडॉल' पहिला सीझनचा विजेता आहे. हा शो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित झाला होता. या शोमधून त्याला खूप फेम मिळालं. या एक संगीत स्पर्धा रिअॅलिटी शोनंतर अभिजीतचं आयुष्य पूर्णपणे बदललं.
हेही वाचा :