मुंबई : अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपैकी एक आहेत. दिर्घकाळापासून दोघेही एकामेंकाना डेट करत आहेत. आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच तेजस्वीची आई 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये आली, तेव्हा फराह खाननं तेजस्वीच्या लग्नाबद्दल विचारले. यावर तिच्या आईनं सांगितलं की, लग्न यावर्षी होईल. आता करण आणि तेजस्वीनं या बातमीचं खंडन केलंय. लग्नाच्या बातम्यांदरम्यान, करण आणि तेजस्वी दुबईमध्ये एन्जॉय करत आहेत. तेजस्वीनं तिच्या इंस्टाग्रामवर डिनर डेटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करण त्याच्या जेवणाचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे.
तेजस्वी प्रकाशनं करण कुंद्राबरोबरचे केले फोटो शेअर : या फोटोशिवाय तेजस्वीनं डिनर डेटचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत,ज्यामध्ये स्वादिष्ट असे काही खाद्यपदार्थ दिसत आहेत. अलीकडेच बातमी आली होती की, करण आणि तेजस्वी दुबई ब्लिंग नावाच्या रिअॅलिटी शोमध्ये लग्न करणार आहेत, यामुळेच दोघेही दुबईला गेले आहेत. तेजस्वी आणि करण अनेकदा एकत्र बाहेर फिरताना दिसतात. दोघेही अनेकदा एकामेंकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या दोघांची जोडी ही अनेकांना आवडते. करण आणि तेजस्वी हे लिव्ह - इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची प्रेमकहाणी : करण अनेकदा तेजस्वीचं कौतुक करताना दिसतो. याशिवाय काही दिवसापूर्वी या दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. दरम्यान करण आणि तेजस्वी यांची प्रेम कहाणी ही बिग बॉसच्या घरात सुरू झाली होती. इथेच या दोघांना एकामेंकावर प्रेम झालं होतं. हा शो सोडल्यानंतर देखील दोघेही एकत्र दिसले. तसेच बिग बॉस शोमध्ये करणनं तेजस्वीची खूप साथ दिली आहे. याशिवाय अलीकडे तेजस्वी ही 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' या शोमध्ये दिसली आहे. यामध्ये ती सेकंड रनअप होती. हा शो देखील खूप गाजला होता. आता तेजस्वीला स्वतःचे रेस्टॉरंट उघडायचे आहे, यामध्ये तिची मदत हा करण करत आहे.
हेही वाचा :