मुंबई - स्नेह पोंक्षे दिग्दर्शन करत असलेल्या 'बंजारा' चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आलाय. रोड ट्रिपवर निघालेल्या तीन दोस्तांच्या राईडपासून याची सुरुवात होते. हिमालयाच्या ट्रिपवर गेलेल्या या तीन मित्रांच्या इमोशनल गोष्टीमध्ये तरुणाईचा जोष आहे, अनुभवी ज्येष्ठांचं समजूतदार गोष्टी आहेत आणि विचार बदलून टाकणारं भाष्यही आहे. टिझर खूपच आश्वासक वाटत असून अवधूत गुप्तेच्या संगीतानं याचा दर्जा उंचावला आहे.
आजवर रंगभूमी आणि चित्रपट यामधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले अभिनेता शरद पोंक्षे या चित्रपटातून पहिल्यांदाच निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात शरद पोंक्षें, भरत जाधव आणि सुनिल बर्वे यांचाही एक समांतर ट्रॅक दिसत असून तरुणांची आणि त्यांची कशी भेट होते आणि कथनक कुठल्या वळणानं पुढं सरकत हे पाहणं रंजक असणार आहे. या चित्रपटाच लेखन आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षेंनं केल असून यामध्ये एक महत्त्वाची भूमिकाही तो साकारत आहे.
वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्स यांनी संयुक्तपणे सादर केलेल्या 'बंजारा' या सिनेमाची निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे यांनी केली आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे या ज्येष्ठ कलाकारासह स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'बंजारा' हा चित्रपट फक्त रोड ट्रिपचा अनुभव देणारा नाही तर प्रत्येकाच्या मनात दडलेल्या स्वप्नांचा मागोवा घेणाराही आहे. या कथेतील मित्रांचं यामुळं केवळ पर्यटन होणार नाही तर त्याच्या विचारसरणीलाही नवी पालवी फुटणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्नेह पोंक्षे आपलं कलाक्षेत्रातील कर्तृत्व दाखवणार असल्यामुळं वडील म्हणून शरद पोंक्षेंसाठी ही अभिमानाची बाब आहे. 'बंजारा' हा चित्रपट येत्या १६ मे रोजी महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -