मुंबई: 'तनु वेड्स मनु' आणि 'शादी में जरूर आना' सारख्या हिट चित्रपटांनी मन जिंकल्यानंतर, प्रसिद्ध निर्माते विनोद बच्चन 'गिन्नी वेड्स सनी'च्या बहुप्रतीक्षित सीक्वेलसह रोमान्स आणि कॉमेडीची जादू परत आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'गिनी वेड्स सनी २' या चित्रपटात प्रतिभावान अविनाश तिवारी आणि मेधा शंकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. उत्तराखंडमध्ये या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अविनाश आणि मेधा यांनी सेटवरील क्लॅपबोर्डचे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. दरम्यान यामी गौतम आणि विक्रांत मेस्सी अभिनीत 'गिनी वेड्स सनी' हा चित्रपट २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि लवकरच तो सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांपैकी एक बनला.
विनोद बच्चन यांनी केल्या भावना व्यक्त : आता, या चित्रपटाचा सीक्वेल एका नवीन कहाणी आणि ट्विस्टसह परत येत आहे, हा चित्रपट सर्व वयोगटातील लोक पाहू शकेल. चित्रपटात कौटुंबिक मनोरंजन, विनोद आणि काही मन जिंकणारे क्षण असणार आहेत. 'गिनी वेड्स सनी पार्ट २'बद्दल बोलताना निर्माते विनोद बच्चन यांनी म्हटलं, "गिनी वेड्स सनी' या चित्रपटाच्या जगात एक नवीन अध्याय सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या प्रेमामुळं आम्हाला नवीन कथानक आणि पात्रे एक्सप्लोर करण्यास प्रोत्साहित केले आणि अविनाश आणि मेधाबरोबर आम्हाला एक ताजी आणि गतिमान जोडी सापडली आहे. आम्हाला खात्री आहे की हा सीक्वेल आणखी मजेदार असेल."
'गिनी वेड्स सनी २' चित्रपटाबद्दल : आता सोशल मीडियावर 'गिनी वेड्स सनी २'चा सुंदर प्रोमो आणि फोटो पाहिल्यानंतर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया या पोस्टवर देत आहेत. एका यूजरनं या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'खूप सुंदर चित्रपट असणार आहे, ही नवीन जोडी हिट असेल.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मी हा चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'तुमच्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.' याशिवाय अनेकजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून, या नवीन जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटाच्या सीक्वेलचं लेखन आणि दिग्दर्शन प्रशांत झा यांनी केलं आहे आणि सौंदर्य प्रॉडक्शनच्या बॅनरखाली विनोद बच्चन यांनी त्याची निर्मिती केली आहे.
हेही वाचा :