हैदराबाद - तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये सध्या जगभरातील सौंदर्यवती 'मिस वर्ल्ड स्पर्धा २०२५'च्या निमित्तानं एकत्र आल्या आहेत. सध्या ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा सुरू असून येत्या ३१ मे रोजी नव्या मिस वर्ल्डची घोषणा होईल. यानिमित्तानं बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननं तिच्या मिस युनिव्हर्सच्या दिवसांची आठवण काढली आहे. ३१ वर्षापूर्वी २१ मे रोजी सुष्मितानं 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा जिंकली होती. १०९४ मध्ये तिनं हा प्रतिष्ठित किताब जिंकला होता.
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी सौंदर्यवती सुष्मिता सेन तिच्या ऐतिहासिक मिस युनिव्हर्स विजयाचं ३१ वं वर्ष साजरं करत आहे. २१ मे १९९४ रोजी फिलीपिन्समधील मनिला इथं तिला मिस युनिव्हर्सचा किताब देण्यात आला होता. या विजयासह, ती हा मुकुट परिधान करणारी पहिली भारतीय महिला बनली होती.
बुधवारी २१ मे रोजी, सुष्मिता सेननं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मिस युनिव्हर्सच्या मुकुटाचं काही संस्मरणीय फोटो पोस्ट केलेत. या पोस्टसह तिनं एक सुंदर हृदयस्पर्शी नोटही लिहिली आहे. तिला हा किताब मिळाला तो क्षण भारतासाठीही 'ऐतिहासिक विजय' असल्याचं तिनं म्हटलंय.
१९९४ मध्ये 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकणारी पहिली भारतीय सुष्मिता सेन हिचं आयुष्य देखील अनेक घटनांनी भरलेलं आहे. यापैकी बऱ्याच गोष्टी कदाचित आपल्यापैकी काहींना माहिती नसतील. वयाच्या १८ व्या वर्षी 'मिस युनिव्हर्स' बनलेल्या सुष्मिता सेनबद्दल थोडं आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.
- सुष्मिता ही मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय होती, त्यामुळे भविष्यातील भारतीय स्पर्धकांसाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला.
- सुष्मिता सेननं जेव्हा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती. ही स्पर्धा फिलीपिन्समधील मनिला येथे आयोजित करण्यात आली होती.
- १९९४ च्या मिस युनिव्हर्समध्ये सुष्मिता सेनचा मुलाखतीचा शेवटचा प्रश्न होता: 'तुझ्यासाठी स्त्री असण्याचे सार काय आहे?' जरी तिला त्यावेळी 'सार' चा अर्थ माहित नव्हता, तरीही तिनं हृदयस्पर्शी उत्तर दिलं. या प्रश्नावर सुष्मिता सेन म्हणाली, फक्त एक स्त्री असणं ही देवाची देणगी आहे जी आपण सर्वांनी जपली पाहिजे. एका स्त्रीच्या पोटी मूल जन्माला येतं. तिचं काळजी घेण, शेअर करणं आणि प्रेम करणं यातून काय दिसतं, तर हे स्त्री असण्याचं सार आहे.
- सुष्मितानं अमेरिकेत कांजिण्या आणि मलेरियाशी झुंज दिली पण धडपड न सोडता तिनं तिच्या कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
- सुष्मितानं १९९४ मध्ये मिस इंडिया स्पर्धा देखील जिंकली होती. त्यानंतर ती मिस युनिव्हर्सच्या मंचावर पोहोचली. १९९४ च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सुष्मिता सेननं ऐश्वर्या रायचा पराभव केला होती. ऐश्वर्या राय पहिली उपविजेती ठरली, तर सुष्मिता सेन विजेती ठरली होती.
- १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, सुष्मिताने बॉलिवूडमध्ये करिअर केलं. १९९६ मध्ये 'दस्तक' चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
- नागार्जुनबरोबर 'रत्चागन' या तमिळ संगीतमय चित्रपटातून सुष्मिताला प्रसिद्धी मिळाली. तर, तिच्या 'सिर्फ तुम' (१९९९) या चित्रपटानं तिला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवून दिली.
- २००० मध्ये 'बिवी नंबर १' या चित्रपटातील भूमिकेसाठी सुष्मिता सेनला सर्वोत्कृष्ट सह-अभिनेत्री श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०२० मध्ये 'आर्या' या वेब सिरीजमधील तिच्या अभिनयासाठी तिनं 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारही जिंकला.
- सुष्मितानं रेनी आणि अलिसा या दोन सुंदर मुलींना दत्तक घेतलं आणि एकटीनं त्याचं आई होऊन संगोपन केलं. लहान वयामुळे सुष्मिताला मूल दत्तक घेण्याची परवानगी नव्हती. परंतु, उच्च न्यायालयानं नंतर अपील निकाली काढलं आणि निकाल त्यांच्या बाजूनं लागला.
- १९९४ मध्ये फिलीपिन्समध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत विजय मिळवण्यापूर्वी, सुष्मितानं त्याच वर्षी किशोरवयात फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता.
- सुष्मिताचे टोपणनाव 'टीटू' आहे.
- त्या काळातील बहुतेक शाळा हिंदी माध्यामांच्या असल्यानं सुष्मिताचं इंग्रजी चांगलं नव्हतं. वयाच्या १६ वर्षापर्यंत तिला इंग्रजी कसं बोलायचं हेही माहिती नव्हतं. पण नंतर तिनं केवळ इंग्रजीत प्रभुत्व मिळवलं नाही तर ती इंग्रजी ऑनर्सची विद्यार्थिनी बनली आणि पत्रकारितेची पदवीही मिळवली.
हेही वाचा -