ETV Bharat / entertainment

महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल देवगण, मुक्ता बर्वे आणि भीमराव पांचाळे यांना राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर - ASHISH SHELAR ANNOUNCED AWARDS

महाराष्ट्र राज्य सरकाराच्या वतीनं सिने क्षेत्रात विशेष कामगिरी आणि योगदान देणाऱ्या लोकांसाठी पुरस्कारांचं वितरण केलं जातं. यंदाच्या पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे.

Ashish Shelar
आशिष शेलार (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 17, 2025 at 5:05 PM IST

1 Min Read

मुंबई - सिनेसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी आणि विशेष योगदान देणाऱ्यांना प्रत्येक वर्षी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कार दिले जातात. यावर्षी मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. यात चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा ५ महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा आशिष शेलार यांनी केली. आज त्यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन या पुरस्कारांची घोषणा केली.

पुरस्कार विजेत्यांची नाव आणि पुरस्कारांचं स्वरुप -

व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार - ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला. १० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक असे पुरस्कारचे स्वरुप असणार आहे.

व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार - अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना जाहीर. ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाच्या स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार - सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना जाहीर. रोख रक्कम १० लाख रुपये पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज कपूर विशेष योगदान पुरस्कार - अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण. रोख रक्कम ६ लाख रुपये पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

१९९३ पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार - गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर, रोख रक्कम १० लाख, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार वितरण सोहळा - दरम्यान, हे सर्व पुरस्कार २५ एप्रिल २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, वरळी, मुंबई येथे एका भव्यदिव्य कार्यक्रमात होणार आहे. तसेच याव्यतिरिक्त संविधानाचे अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे सांगीतिक मानवंदना कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, ह्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमात गायक सुरेश वाडकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.