मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्धी गायक सोनू निगमनं अलीकडेच राजधानी दिल्लीतील, दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठात एक धमाकेदार सादरीकरण केलं. या कार्यक्रमात सोनूला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये सोनू निगमच्या शोबद्दल असं म्हटलं जात आहे की, शो दरम्यान लोकांनी दगडफेक केली आणि बाटल्या फेकल्या, त्यानंतर शो थांबवावा लागला. सोनू निगमच्या शोमधील दगडफेकीची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. आता प्रकरणी सोनू निगमनं स्वतः सोशल मीडियावर येऊन सत्य सांगितलं आहे. सोनू निगमनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या शोशी संबंधित अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.
सोनू निगम काय म्हटलं? : सोनू निगमनं दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठात दगडफेकीच्या बातम्या खोट्या असल्यानं म्हटलं आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या शोमध्ये दगडफेक किंवा बाटल्या फेकल्या गेल्या नाहीत, कोणीतरी स्टेजवर वेप फेकला, जो सुभांकरच्या छातीत लागला आणि जेव्हा मला याची माहिती मिळाली तेव्हा मी शो थांबवला. यानंतर मी कॉलेजच्या लोकांना विनंती केली आणि त्यांना आठवण करून दिली की जर असं काही पुन्हा घडलं तर शो अचानक थांबवावा लागेल. त्यानंतर स्टेजवर फक्त 'पुकी' बँड फेकले गेला, जो खरोखर पुकी होता.' ज्या व्यक्तीनं स्टेजवर गुलाबी केसांचा बँड फेकला, यानंतर सादरीकरण करताना लगेच सोनूनं ते घालून परफॉर्म केलं. सोनू निगमनं या बँडचं नाव 'पुकी असं ठेवलंय.
सोनू निगमनं केला खुलासा : दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमधील सोनू निगमच्या शोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. यानंतर असा दावा करण्यात आला होता की, गायकावर प्रेक्षकांनी हल्ला केला होता, मात्र सोनूच्या सोशल मीडिया पोस्टनं आता सर्व काही स्पष्ट झालं आहे. दरम्यान आणखी एक घटना गायिका नेहा कक्कबरोबर मेलबर्न कॉन्सर्टदरम्यान घडली आहे. ती शोला तीन तास उशिरा पोहोचली, यानंतर तिच्यावर प्रेक्षक संतप्त झाले. नेहा स्टेजवर येताच गो बॅकच्या घोषणा देऊ लागले. यावेळी, नेहा स्टेजवर रडली आणि तिच्या चाहत्यांना माफी मागितली.
हेही वाचा :