ETV Bharat / entertainment

सायमा 2024मधील ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याचा व्हिडिओ पाहिल्यावर चाहत्यांनी केलं कौतुक - SIIMA 2024

Aishwarya Rai Daughter Aaradhya : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमारबरोबर दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण आराध्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 19, 2024, 2:59 PM IST

Aishwarya Rai Daughter Aaradhya
ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या (ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या (ANI))

मुंबई - Aishwarya Rai Daughter Aaradhya : बॉलिवूडचे जोडपे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ही चर्चेत आली आहे. नुकताच दुबईमध्ये सायमा 2024 (SIIMA 2024) सोहळा पार पडला. या कार्यक्रमात ऐश्वर्यानं आपल्या मुलीची ओळख कन्नड सुपरस्टारशी करून दिली. यावेळी आराध्यानं असं काही केलं, ज्यामुळे तिचं सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ऐश्वर्या अवार्ड घेऊन साऊथ अभिनेता विक्रमबरोबर स्टेजवरून खाली उतरताना दिसत आहे. यानंतर ऐश्वर्याची मुलगी आराध्या ही तिच्याजवळ येऊन तिला घट्ट मिठी मारते.

आराध्यानं घेतला कन्नड स्टार शिव राजकुमार यांचा आशीर्वाद : पुढं ऐश्वर्या मुलगी आराध्याची ओळख कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमारशी करून दिली. यानंतर आराध्या शिव राजकुमार यांना हात जोडून अभिवादन केलं आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यावेळी ऐश्वर्यानं तिच्याकडे प्रेमानं पाहून सुंदर अशी स्माईल दिली. दरम्यान ऐश्वर्या रायला दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन 2' मधील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) श्रेणीमधील 'सायमा' पुरस्कार मिळाला आहे. हा खास क्षण आराध्यानं तिच्या मोबाईलमध्ये कैद केला. याशिवाय ऐश्वर्या आराध्या बच्चनबरोबर रेड कार्पेटवर देखील फिरताना दिसली. अवॉर्ड शोमध्ये जाण्यापूर्वी आई-मुलीच्या जोडीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

आराध्यानं जिंकलं यूजर्सचं मन : दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आता अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण आराध्याच्या संगोपनाबद्दलचं कौतुक करत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'ऐश्वर्यानं आपल्या मुलीला जे संस्कार दिले आहेत, ते इतर कोणत्याही अभिनेत्रीच्या मुलीमध्ये पाहायला मिळत नाहीत.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'हे संस्कार तिला ऐश्वर्यानं दिले आहेत.' आणखी एकानं लिहिलं, 'आराध्या नेहमीच तिच्या आईला पाठिंबा देण्यासाठी तिच्याबरोबर जाते, ती बॉलिवूडमधील सुंदर 'स्टारकीड' आहे.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट देखील शेअर करत आहेत.

हेही वाचा :

  1. सायमा 2024 पुरस्कार विजेत्यांची यादी, कोणी मारली बाजी जाणून घ्या... - SIIMA 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.