ETV Bharat / entertainment

'स्टाईल'मधून शर्मन जोशीला स्टारडम मिळालं, '३ इडियट्स' चित्रपटानं बनवलं सुपरस्टार... - SHARMAN JOSHI BIRTHDAY

शर्मन जोशी आज त्यांचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहेत. या प्रसंगी त्याच्या आयुष्यातील काही विशेष गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sharman Joshi
शर्मन जोशी (Sharman Joshi ( Photo - Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 28, 2025 at 1:57 PM IST

1 Min Read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी आज २८ एप्रिल रोजी आपला ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. हा दिवस शर्मनसाठी खूप विशेष आहे. प्रेक्षकांना 'स्टाईल', 'गोलमाल' आणि '३ इडियट्स' या चित्रपटामधील त्याचा अभिनय खूप आवडला. उत्कृष्ट कॉमिक टायमिंगबद्दल आणि दमदार अभिनयासाठी शर्मनला चित्रपटसृष्टीत ओळखले जाते. आज आम्ही या विशेष प्रसंगी त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

शर्मन जोशीनं केली गुजराती रंगभूमीवर काम : २००१ मध्ये, शर्मन आणि साहिल खानचा सुपरहिट चित्रपट 'स्टाईल' प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील चंटू-बंटू' या पात्रांनी सर्वांची मनं जिंकली. या चित्रपटानंतर शर्मन जोशीचं नशीब बदललं. त्याला अनेक चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले. दरम्यान शर्मन जोशीचा जन्म २८ एप्रिल १९७९ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यानं त्याच्या कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीपासून केली. त्याचे वडील अरविंद जोशी हे एक प्रसिद्ध गुजराती रंगभूमी कलाकार होते. शर्मननं हिंदी चित्रपटसृष्टीत 'गॉडमदर' चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटाला सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शर्मननं वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा चोप्राशी लग्न केलं.

शर्मन जोशी वर्कफ्रंट : मिळालेल्या माहितीनुसार पहिल्याच भेटीत शर्मन प्रेरणाच्या प्रेमात पडला होता. त्यानं प्रेरणाबरोबर ५ जून २००० रोजी लग्न केलं. दरम्यान शर्मन जोशीचा '३ इडियट्स' हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटामध्ये त्यानं राजू रस्तोगीची व्यक्तिरेखा केली होती. त्याची ही भूमिका अनेकांना आवडली होती. मीडिया रिपोर्टनुसार शर्मननं सांगितलं होत की, हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक पालक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की त्यांनी त्यांच्या मुलांना आवडीचे करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिलंय. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अमिर खान आणि आर. माधवन हे स्टार्स दिसले आहेत. यानंतर शर्मन 'गोलमाल: फन अनलिमिटेड' चित्रपटामध्ये दिसला होता. यामध्ये त्यानं लक्ष्मणची भूमिका साकारली होती, मात्र दुसऱ्या भागात त्याची जागा श्रेयस तळपदेनं घेतली. यानंतर शर्मननं गंमतीनं रोहित शेट्टीला 'गोलमाल ५'मध्ये परत घेण्यास सांगितलं होतं.

हेही वाचा :

  1. ओटीटीवर कॉमेडी शोजची वानवा - शर्मन जोशी
  2. बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटात तेजश्रीचा लिपलॉक, 'बबलू बॅचलर'चा ट्रेलर प्रदर्शित
  3. तेजश्री प्रधानची बॉलिवूड एन्ट्री, शर्मन जोशीसोबत साकारणार मुख्य भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.