आयफा 2025मध्ये करीना कपूर - शाहिद कपूरला एकत्र पाहून चाहते झाले आनंदी, बऱ्याच वर्षांनंतर रंगल्या गप्पा..
जयपूरमध्ये आयफा 2025चा भव्य कार्यक्रम होत आहे. या सोहळ्यातील करीना कपूर आणि शाहिद कपूरची गळाभेट हे सध्या चर्चेत आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : March 9, 2025 at 10:55 AM IST
मुंबई : गुलाबी शहर जयपूरमध्ये आयफा 2025चा भव्य कार्यक्रम यावर्षी आयोजित केला जात आहे. या शानदार चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील मोठे स्टार्सनं हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात करण जोहर, शाहिद कपूर, करीना कपूर, नोरा फतेही यांच्यासह अनेक स्टार्स उपस्थित आहेत. या कार्यक्रमाद्वारे, शाहिद कपूर आणि करीना कपूर अनेक वर्षांनी एकाच मंचावर एकत्र दिसले. या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकामेंकाबरोबर संवाद साधताना दिसत आहे.
करीना कपूर आणि शाहिदला एकत्र पाहून चाहते खुश : अवार्ड शोपूर्वी करीना कपूर आपल्या मुलांबरोबर मुंबई विमानतळावरून जयपूरला रवाना झाली होती. दरम्यान पुरस्कार सोहळ्यात करीना ग्लॅमरस अंदाजात दिसली. दुसरीकडे शाहिद कपूर ऑफ-व्हाइट ब्लेझर-पँटमध्ये आला होता. यावेळी शाहिद आणि करीनानं एकामेकांना मीठी मारून अभिवादन केलं. या कार्यक्रमात त्यानं पापाराझींशी बोलताना सांगितलं की, तो त्याच्या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म करणार आहे. सध्या आयफा 2025चा सर्वत्र बोलबाला आहे. शाहिद कपूर आणि करीनाची जोडी ही अनेकांना आवडते. या दोघांनी एकामेंकांना अनेक वर्ष डेट केलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टीकू शकलं नाही. करीनानं बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानबरोबर लग्न केलं, तर शाहिदनं मीरा राजपूतसोबत लग्न केलं.
क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यनचं पुनर्मिलन : तसेच आयफाच्या रेड कार्पेटवरील क्रिती सेनॉननं वन-शोल्डर ड्रेसमधील तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले, याशिवाय कार्तिक आर्यनचा ऑफ-व्हाइट ब्लेझर आणि लांब केसांचा लूक हा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तसेच कार्यक्रमात चाहत्यांना कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांना देखील एकत्र पाहून अनेकांना आनंद झाला. कार्तिक आर्यन आणि क्रितीनं एकेकाळी एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या होत्या. दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही. तसेच आयफाच्या दरम्यान, दोघांनी एकमेकांना मीठी मारली आणि अभिवादन केलं.

