ETV Bharat / entertainment

'या' साऊथकडील अभिनेत्रीनं शाहरुख खान स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारला, अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही... - SAMANTHA RUTH PRABHU BIRTHDAY

साऊथच्या सुपरहिट अभिनेत्रीनं बॉलिवूड शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर नाकारली होती. आता ही अभिनेत्री कोण आहे, याबद्दल जाणून घ्या...

Samantha ruth prabhu
सामांथा रूथ प्रभू ('या' साऊथ अभिनेत्रीनं शाहरुख खानचा चित्रपट नाकारला होता. (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 28, 2025 at 5:06 PM IST

1 Min Read

मुंबई : जगभरात साऊथ चित्रपटसृष्टीचं क्रेझ वाढत आहे. गेल्या काही वर्षांत साऊथ चित्रपटसृष्टीनं धमाकेदार चित्रपट दिले आहेत. आता एक अशी अभिनेत्री आहे, जिनं अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही, पण तरीही ती लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. या अभिनेत्रीनेही बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारला होता. 'किंग खान'च्या चित्रपटाची ऑफर नाकारणारी साऊथ अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सामांथा रूथ प्रभू आहे. सामांथा रूथ प्रभूचा अभिनय अनेकांना आवडतो. याशिवाय ती सर्वात श्रीमंत साऊथ अभिनेत्रींपैकी एक आहे. सामांथानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

कोणता चित्रपट नाकारला होता? : सामांथाला शाहरुखच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा तिनं काही वैयक्तिक कारणांमुळे ती ऑफर नाकारली होती. सामांथानं शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात काम केल नाही. रिपोर्ट्सनुसार, सामांथा किंग खानबरोबर 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. तिला फोर्स वनच्या प्रमुख आणि आझाद राठोड यांच्या पत्नी नर्मदा राय राठोडची भूमिका ऑफर करण्यात आली होती. सामंथानं २०१९ मध्ये वैयक्तिक कारणांमुळे ही ऑफर नाकारली होती. यानंतर 'जवान' चित्रपट नयनताराला ऑफर करण्यात आला. तिनं ही भूमिका स्वीकारली आणि या ब्लॉकबस्टर अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाद्वारे तिचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही ? : सामांथा रूथ प्रभूनं अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. सामांथानं हिंदी सेलिब्रिटींबरोबर काम केलंय. अलीकडेच ती 'सिटाडेल: हनी बनी' चित्रपटात बॉलिवूड स्टार वरुण धवनबरोबर दिसली होती. 'सिटाडेल: हनी बनी' या अभिनेत्रीनं यापूर्वी 'जवान'चे दिग्दर्शक अ‍ॅटलीबरोबर दोन प्रोजेक्टमध्ये काम केलंय, जे हिट ठरले. यामध्ये 'थेरी' आणि 'मेर्सल' यांचा समावेश आहे. सामंथानं मनोज वाजपेयी यांच्याबरोबर 'द फॅमिली मॅन' या सीरीजमधून हिंदी भाषेत पदार्पण केलं. या सीरीजमध्ये सामांथा अ‍ॅक्शन अवतारात दिसली होती, जी लोकांना खूप आवडली. आता सध्या सामांथा रूथ प्रभूनं आपल्या कामातून ब्रेक घेतला आहे.

हेही वाचा :

  1. सामंथा रुथ प्रभूनं नवीन वर्षाची केली जबरदस्त सुरुवात, कसरत करताना व्हिडिओ व्हायरल
  2. 'सामंथाचे वडील सार्वजनिक ठिकाणी दिसणं का टाळायचे?' त्यांनीचं सांगितलं होतं कारण
  3. सामंथा रुथ प्रभूच्या वडिलांचे निधन, अभिनेत्रीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.