शिर्डी (अहमदनगर) - अभिनेता सलमान खानचा विश्वासू अंगरक्षक शेराचा मुलगा अबीर सिंग लवकरच चित्रपटाच्या रंगीत दुनियेत प्रवेश करणार आहे. याबद्दलची चर्चा गेल्या अनेंक दिवसांपासून सोशल मीडियासह विविध माध्यमांवरती सुरू आहे. अशातच शेरा आणि त्याचा मुलगा अबीर सिंग यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं आहे.
अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक शेरानं आपल्या मुलासह 20 एप्रिल रोजी शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचे मनोभावे दर्शन घेतलं. साईबाबांच्या सामधीच्या दर्शनानंतर द्वारकमाई , गुरुस्थानचंही दर्शन शेरानं आपल्या मुलासह घेतलं आहे. साई दर्शनानंतर संस्थानचे उपकार्यकरी अधिकारी भीमराज दराडे यांनी शेरा आणि मुलगा अबीर सिंग यांचा शॉल आणि साई मूर्ती देऊन सत्कार केला.

आमच्या कुटुंबियानावर साईबाबांची कृपा आहे. नचुकता मी वर्षातून दोन ते तीन वेळी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतो. साईबाबांच्या सामधीचे दर्शन घेऊन मनाला समाधान मिळत, असल्यां यावेळी शेरा म्हणाला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अबीर सिंग चित्रपटाचा दुनियेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर बोलण्यास शेराने टाळलं. मात्र लवकरच आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी देणार असल्याचं शेरा यावेळी म्हणाला. ही आनंदाची बातमी नेमकी काय असेल याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानचा अंगरक्षक असलेल्या शेरा यानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधान भवनात जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरून राज्यात अनेंक चर्चांना उधाण आलं होतं. यावर बोलताना शेरा म्हणाला, की प्रताप सरनाईक माझे मित्र आहे त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी गेलो होतो. दुसरी काहीही चर्चा झाली नसल्याच "ई टीव्ही भारतशी" बोलतांना शेरानं सांगितलं.

कौन आहे शेरा? - सलमानचा सर्वात विश्वासू असलेला शेरा हा त्याच्याबरोबर सावलीसारखा वावरत असतो. गेल्या काही दिवसापासून सलमान खानला धमकी देण्याचं सत्र सुरू असल्यामुळं त्याची जबाबदारी वाढली आहे. शेरा याचं खरं नाव गुरमित सिंग जॉली असं आहे. १९९५ पासून तो सलमानच्या सुरक्षा सेवेत कार्यरत आहे. शेरा हा स्वतः बॉडी बिल्डर असून गेली ३० वर्षे तो सलमानबरोबर तो जिथं जाईल तिथं जात असतो.
हेही वाचा -