मुंबई - यंदा ईदच्या निमित्तानं रिलीज होणाऱ्या 'सिकंदर' चित्रपटाबद्दलची मोठी उत्कंठा सलमानच्या चाहत्यांसह फॉलोअर्सना लागून राहिली आहे. सलमाननं याबद्दलचं एक अपडेट शेअर करत 'सिकंदर'चं नवं पोस्टर रिलीज केलंय. विशेष म्हणजे सलमानचा मित्र आणि सिकंदरचा निर्माता साजिद नाडियादवाला याच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हे पोस्टर लॉन्च केलं आहे. 'सिकंदर' चित्रपटाचं दिग्दर्शन ए.आर. मुर्गादोस यांनी केलं आहे आणि यामध्ये सलमान खानबरोबर रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.
चाहत्यांना भेट म्हणून सलमानने एक नवीन पोस्टर शेअर केलंय. यावर सलमानचा जबरदस्त लूक दिसत आहे. पोस्टर शेअर करताना सलमाननं लिहिलंय, "ए.आर. मुर्गादोस दिग्दर्शित साजिद नाडियाडवालाचा सिकंदर ईदला रिलीज होतोय." सलमान खानचा करारी लूक असलेल्या या पोस्टरमधून आणि पोस्टर मागे असलेल्या पार्श्वसंगीतातून चित्रपटात भरपूर अॅक्शन असणार याची खात्री पटते.
Sikandar On Eid#SajidNadiadwala’s #Sikandar
— Salman Khan (@BeingSalmanKhan) February 18, 2025
Directed by @ARMurugadoss
@iamRashmika @DOP_Tirru @ipritamofficial @Music_Santhosh @NGEMovies @WardaNadiadwala @ZeeMusicCompany @PenMovies #SikandarEid2025 pic.twitter.com/N3Wxh6EkOH
यापूर्वी सलमान खाननं साजिद नाडियादवालाला त्याच्या खास दिवसाच्या शुभेच्छा देताना एक फोटो शेअर केला होता. यामध्ये सलमाननं त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त रिलीज होणाऱ्या पोस्टरबद्दलची उत्सुकता व्यक्त केली.
२०२५ च्या सर्वाधिक प्रतीक्षित रिलीजच्या आयएमडीबी यादीमध्ये 'सिकंदर' वरच्या स्थानावर असल्यानं या पोस्टला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. चाहते २८ मार्च २०२५ रोजी ईद-उल-फित्रच्या उत्सवाच्या निमित्तानं चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाबद्दलच्या डिटेल्सची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. २०१४ मध्ये आलेल्या प्रचंड सुपरहिट 'किक' नंतर हा चित्रपट सलमान आणि साजिद यांच्या दुसऱ्या सहकार्याचे प्रतीक असेल.
SALMAN KHAN - SAJID NADIADWALA: 'SIKANDAR' POSTER *TODAY* AT 3.33 PM... On his birthday today, #SajidNadiadwala receives heartfelt wishes from his close friend, #SalmanKhan.#Sikandar | #SikandarPoster | #WardaNadiadwala | #SikandarEid2025 pic.twitter.com/GeX6yW87nU
— taran adarsh (@taran_adarsh) February 18, 2025
'सिकंदर'मध्ये अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित 'हाऊसफुल ५' या कॉमेडी फ्रँचायझीचा ट्रेलर दाखवण्यात येईल. हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हाऊसफुल मालिकेतील पाचव्या फ्रँचायझीचा ट्रेलर सिकंदरशी जोडला जाणार आहे.
तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'हाऊसफुल' हा वर्षातील सर्वात मोठ्या विनोदी चित्रपटांपैकी एक आहे. यात अक्षय, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन आणि इतर १८ कलाकारांचा समावेश आहे. या ईदचा आनंद दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी द्विगुणित करणारा असेल.
हेही वाचा -