मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'सिकंदर' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित या चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील आहे. सलमान मोठ्या उत्साहानं या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. अलीकडच्याच एका मुलाखतीत सलमान खाननं लॉरेन्स बिश्नोईकडून सतत मिळणाऱ्या धमक्यांबाबत आपलं मौन सोडलं आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमांना आणि मुलाखतींना सामोरं जावं लागत आहे. अलीकडेच भाईजाननं चित्रपटाच्या प्रमोशनबाबत एका मीडिया ग्रुपशी संवाद साधला. यावेळी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळत असलेल्या धमक्यांबाबत विचारण्यात आलं.
बिश्नोईच्या धमक्यांवर सलमान खानची प्रतिक्रिया : सलमानला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांची भीती वाटते का? असा प्रश्न केला गेला. यावर प्रतिक्रिया देताना सलमान खाननं आकाशाकडे बोट दाखवत म्हटलं, "देव, अल्लाह सर्व वरती आहेत. आपण किती जगू हे सर्व लिहून आहे, आयुष्य जितकं आहे, तेवढंच आपण जगू, कधी कधी आपल्याला इतके लोकांना सोबत घ्यावे लागते, तेव्हा एक समस्या बनते." 'हम साथ साथ हैं'च्या शूटिंग दरम्यान सलमाननं काळवीट मारल्याचा बदला, बिश्नोई आता घेत आहे. काळ्या हरिणाचा आदर करणारा बिश्नोई समुदाय या घटनेनं खूप दुखावला गेला आहे. 2018 मध्ये, जोधपूरमधील न्यायालयात हजर असताना, बिश्नोई म्हटलं होतं, "आम्ही सलमान खानला मारू. एकदा आम्ही कारवाई केली की, सर्वांना कळेल. मी अजून काहीही केलेलं नाही, ते माझ्यावर कोणतेही कारण नसताना गुन्ह्याचा आरोप करत आहेत." यानंतर हे प्रकरण वाढत गेलं
सलमानच्या मते 'सिकंदर' किती करेल कमाई : एप्रिल 2024मध्ये सलमानच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या. एवढेच नाही तर सलमान खानला बिश्नोई टोळीकडून अनेक धमक्या देखील मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी सलमानचा जवळचा मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. इतक्या धोक्यांनंतरही, सलमान खाननं त्याच्या प्रमोशनल आयुष्यावर परिणाम होऊ दिला नाही. त्यानं 'सिकंदर'चं शूटिंग आणि इतर प्रोजेक्ट्सवर काम सुरू ठेवलं. ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'सिकंदर' हा अॅक्शन चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन 'गजनी' फेम एआर मुरुगदास हे करत आहे. अलीकडेच, चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान, सलमाननं सांगितलं की, हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा ओलांडेल असा त्याला विश्वास आहे.
हेही वाचा :