मुंबई - 'चक दे इंडिया' अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी भारतीय क्रिकेटपटू जहीर खान यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केलंय. या जोडप्यानं त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्या चिमुकल्याची झलक दिसत आहे. याशिवाय सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, या जोडप्यानं त्यांच्या मुलाच्या नावाचाही खुलासा केला आहे. सागरिका घाटगे आणि जहीर खान यांच्या घरी बाळ झाल्यामुळे त्याचे चाहते खुश झाले आहेत. आता अनेक चाहते त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
सागरिका घाटगे आणि जहीर खान यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन : या जोडप्यानं शेअर केलेले दोन्ही फोटो ब्लॉक अॅन्ड आणि व्हाईट आहेत. एका फोटोत हे जोडपे बाळाला मांडीवर घेऊन असल्याचे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये बाळाचे आणि या जोडप्याचे हात दिसत आहे. हा फोटो शेअर करताना या पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं,'प्रेम कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादांसह आम्ही आमच्या लाडक्या लहान बाळ फतेहसिंह खानचे स्वागत आम्ही करतो.' आता या पोस्टवर एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, 'तुम्हा दोघांचेही अभिनंदन खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'जगात स्वागत आहे, लिटिल प्रिन्स फतेहसिंह!' आणखी एकानं लिहिलं, 'बाळ फतेहसिंहला खूप खूप प्रेम.' जहीर आणि सागरिका यांना लग्नाच्या ८ वर्षांनी पालक झाले आहेत.
स्टार्सन केला प्रेमाचा वर्षाव : याशिवाय काही स्टार्सन या जोडप्यानं ही आनंदाची बातमी दिल्यानंतर, कमेंट सेक्शनमध्ये अभिनंदनाच्या संदेशांचा वर्षाव सुरू आहे. अंगद बेदीनं लिहिलं,'वाहेगुरू' हरभजन सिंगनं लिहिलं,'तुम्हा दोघांचेही अभिनंदन, वाहेगुरु तुम्हाला आशीर्वाद देवो.' हुमा कुरैशीनं या पोस्टवर हार्ट शेअर केला आहे. २०१७ मध्ये सागरिका घाटगे आणि जहीर खान यांनी लग्न केलं होतं. दरम्यान सागरिका घाटगेबद्दल सांगायचं झालं तर ती आताही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिनं आपल्या करिअरची सुरुवात 'चक दे इंडिया'पासून केली. याशिवाय तिनं मराठी चित्रपट 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुख्य भूमिकेत काम केलंय. आता पुढं 'ललाट' या चित्रपटामध्ये काम करत असून अलीकडेच याचं राजस्थानमध्ये शूटिंग पूर्ण झालं.