मुंबई - भट्ट कँपनं आजपर्यंत अनेक प्रकारच्या मनोरंजक चित्रपटांची निर्मिती करुन प्रेक्षकांना आनंद वाटला. त्यांनी २०११ मध्ये बनवलेला 'हॉन्टिंग थ्रीडी' हा चित्रपट त्या काळातील सर्वोत्तम हॉरर चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटामध्ये मिमोह चक्रवर्ती आणि टिया बाजपेयी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केलं होतं. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला चांगलं यश मिळालं होतं. आता १४ वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वेल येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
विक्रम भट्ट दिग्दर्शित 'हॉन्टिंग थ्रीडी' हा चित्रपट भूतकाळात अडकलेल्या एका तरुणाची कथा होती. तो वडिलांच्या सांगण्यावरुन एका जुन्या घराच्या खरेदी व्यवहारासाठी एका ठिकाणी येतो. त्या हवेलीमध्ये एका मुलीचा आत्मा राहात असतो. अनेक विचित्र घटना घटतात आणि त्या तरुणाला त्या मुलीच्या आत्म्याविषयी समजतं. तिच्यावर झालेल्या अन्यायाची त्याला जाणीव होते. यातून तिचा आत्मा मुक्त झाला पाहिजे यासाठी त्याची धडपड सुरू होते. असा अतिशय थरारक, रंजक आणि गूढ कथा असलेल्या 'हॉन्टिंग थ्रीडी' चित्रपटाचा आता दुसरा भाग रिलीज होणार आहे.
MAHESH BHATT - ANAND PANDIT - VIKRAM BHATT JOIN FORCES: 'HAUNTED 3D' ANNOUNCED – 26 SEPT 2025 RELEASE... After the success of #1920: Horrors Of The Heart, the triumvirate – #MaheshBhatt, #AnandPandit and #VikramBhatt – reunite for #Haunted3D: Ghosts Of The Past.
— taran adarsh (@taran_adarsh) April 16, 2025
Stars… pic.twitter.com/iH3lW8Y0WG
जवळजवळ १४ वर्षांनंतर चित्रपटाचे निर्माते 'हॉंटिंग ३डी' च्या सिक्वेलसह मोठ्या पडद्यावर परतले आहेत. सिक्वेलचे निर्माते आनंद पंडित यांनी चित्रपटाचं शीर्षक आणि रिलीज तारीख जाहीर केली आहे. याबरोबरच त्यांनी चित्रपटातील स्टारकास्टचाही खुलासा केला आहे.
१६ एप्रिल रोजी आनंद पंडित यांनी चित्रपटाच्या सिक्वेलचम मोशन पोस्टर शेअर केलं आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, '१९२०: हॉरर्स ऑफ द हार्ट, आमची पुढील हृदयस्पर्शी कथा 'हॉन्टेड ३डी: घोस्ट्स ऑफ द पास्ट' च्या यशानंतर महेश भट्ट आणि विक्रम भट्ट यांच्याबरोबर पुन्हा एकत्र येत असताना आनंद होत आहे. या चित्रपटात महाअक्षय चक्रवर्ती आणि चेतना पांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.'
चित्रपटाच्या रिलीज तारखेची माहिती देताना त्यांनी पुढं लिहिलंय की, "विक्रम भट्ट दिग्दर्शित हा चित्रपट आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि महेश भट्ट प्रस्तुत करणार आहेत. आनंद पंडित, राकेश जुनेजा आणि श्वेतांबरी भट्ट निर्मित, रूपा पंडित आणि राहुल व्ही. दुबे या चित्रपटाची संयुक्तपणे निर्मिती करतील. आजवर कधीही न पाहिलेला एक हॉरर चित्रपट येत्या २६ सप्टेंबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये पाहा."
'१९२०: हॉरर्स ऑफ द हार्ट' च्या यशानंतर, महेश भट्ट, आनंद पंडित आणि विक्रम भट्ट हे त्रिकूट 'हॉन्टेड ३डी: घोस्ट्स ऑफ द पास्ट' साठी पुन्हा एकत्र आलं आहे. यात महाक्षय चक्रवर्ती, ज्याला मिमोह चक्रवर्ती म्हणून ओळखले जाते, आणि चेतना पांडे मुख्य भूमिकेत आहेत. 'हॉन्टेड ३डी: घोस्ट्स ऑफ द पास्ट' २६ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज होईल.
हेही वाचा -