सरगुन मेहता आणि रवी दुबे यांनी दिली आनंदाची बातमी, वाचा सविस्तर...
सरगुन मेहता आणि रवी दुबे यांच्यावर अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. आता हे जोडपे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 18, 2025 at 12:57 PM IST
मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध जोडपे रवी दुबे आणि सरगुन मेहता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी या जोडप्यांच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आली आहे. आता या बातमीमुळं हे जोडपे खूप आनंदी आहेत. रवी दुबेनं सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे. टीव्हीच्या सर्वात श्रीमंत स्टार्समध्ये गणले जाणारे हे जोडपे आता त्यांच्या नवीन घरात राहायला गेले आहे, ज्याबद्दल सरगुन मेहताचे पती रवी दुबेनं त्याच्या इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती शेअर केली आहे, रवीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'आम्ही आमच्या नवीन घराला 'सौभाग्य' असं नाव दिलं आहे.' याशिवाय, स्टारनं स्वतःचा आणि अभिनेत्रीचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
सरगुन मेहता आणि रवी दुबे यांचं नवीन घर : रवीनं आपल्या पोस्टमध्ये पुढं सांगितलं की, ते खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते आणि अखेर सर्व झालं. आता अनेकजण या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. मॉडेल धनश्री आणि अभिनेत्री गौहर खान यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय, एका चाहत्यानं रवीच्या पोस्टवर लिहिलं, 'अद्भुत लोकांचे अभिनंदन... शुभेच्छा.'

सरगुन मेहता आणि रवी दुबे यांचं वर्कफ्रंट : दरम्यान आपण सरगुन मेहता आणि रवी दुबे यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर दोघेही सध्या आघाडीवर आहेत, सरगुन मेहता शेवटी 2 मोठ्या पंजाबी चित्रपटांमध्ये दिसली होती, त्यापैकी पहिला चित्रपट 'सौंकन सौंकने २' आहे, ज्यामध्ये एमी विर्क आणि निमरत खैरा यांचा समावेश आहे, या चित्रपटानं परदेशात जबरदस्त कमाई केली होती. याशिवाय दुसरा चित्रपट 'सरसल्लाह जी' होता. या चित्रपटात गिप्पी ग्रेवाल, निमरत खैरा आणि एमी विर्क हे कलाकार दिसले होते. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. दुसरीकडे, रवी दुबे लवकरच 'रामायण'या मोठ्या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहेत, यामध्ये लक्ष्मणची भूमिका तो साकारणार आहे. या चित्रपटात रवीबरोबर रणबीर कपूर, साऊथ स्टार साई पल्लवी आणि यश हे कलाकार दिसणार आहेत.
हेही वाचा :

