मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ निर्माते मानले जाणारे निर्माते सलीम अख्तर यांचं काल रात्री 8 एप्रिल रोजी निधन झालंय. गंभीर आरोग्य समस्यांमुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्याच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहेत. दरम्यान कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते आणि कर्करोगाशी धैर्यानं झुंज देत होते. बऱ्याच काळापासून ते ग्लॅमरसच्या जगापासून दुर होते.
सलीम अख्तर यांचं निधन : सलीम अख्तर हे ग्लॅमरच्या जगाचा एक महत्त्वाचा भाग होते. ते 1980, 1990 आणि 2000च्या दशकामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय होते. त्यांना सरळ वर्तनासाठी ओळखलं जात होतं. त्यांनी असंख्य मोठ्या सेटअप आणि मनोरंजक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या होम बॅनर 'आफताब पिक्चर्स' अंतर्गत त्यांनी निर्मित केलेल्या चित्रपटांवर नजर टाकली तर त्यापैकी 'चोरों की बारात' (1980), 'कयामत' (1983), 'बलिदान' (1985), 'लोहा' (1987), 'बटवारा' (1989), 'दूध का कर्ज' (1990), 'इज्जत' (1929), 'पोलीस अधिकारी' (1990), 'पोलीस अधिकारी' (1989), (1993), 'फूल और अंगार' (1993), 'आ गले लग जा' (1994), 'द डॉन' (1995), 'बाजी' (1995), 'मेहंदी' (1998), 'बादल' (2000) यांचा समावेश आहे.
सलीम अख्तरनं राणी मुखर्जी आणि तमन्ना भाटिया केलं होतं लॉन्च : त्यांनी चित्रपटसृष्टीतील मोठ्या अभिनेत्रींना लॉन्च केलं आहे. तसेच 'राजा की आयेगी बारात' (1997) आणि 'चांद सा रोशन चेहरा' (2005) या चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर प्रभावी पदार्पण करणाऱ्या राणी मुखर्जी आणि तमन्ना भाटिया या बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींना लॉन्च करण्याचे श्रेयही त्यांना जाते. राणी मुखर्जीचा 'राजा की आयेगी बारात' हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटामधून तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत शादाब खान दिसला होता.