ETV Bharat / entertainment

रणबीर कपूर आलिया भट्ट, विकी कौशल स्टारर 'लव्ह अँड वॉर'ला मिळाली नवीन रिलीज तारीख - Love and War Release Date

Love & War Release Date : रणबीर कपूर आलिया भट्ट आणि विकी कौशल अभिनीत 'लव्ह अँड वॉर'ला नवीन रिलीज डेट देण्यात आली आहे. हा चित्रपट कधी रुपेरी पडद्यावर रिलीज होईल, याबद्दल जाणून घ्या...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2024, 10:38 AM IST

Love & War Release Date
लव्ह अँड वॉर रिलीज डेट (Ranbir Kapoor, Alia Bhatt, Vicky Kaushal (Photo: ANI))

मुंबई Love & War Release Date : 'लव्ह अँड वॉर' हा बहुप्रतीक्षित आगामी चित्रपटांपैकी एक आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत असणार आहे. हे स्टार्स आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी येत आहेत.' लव्ह अँड वॉर' हा चित्रपट 2025 च्या ख्रिसमसला रिलीज होणार होता, मात्र आता याची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख आता जाहीर केली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच विकी हा आलिया आणि रणबीरबरोबर काम करताना दिसेल.

'लव्ह अँड वॉर'च्या रिलीज डेटमध्ये झाला बदल : 'लव्ह अँड वॉर' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवीन रिलीज तारखेनुसार, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल स्टारर हा चित्रपट आता 20 मार्च 2026 रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होईल. या चित्रपटाची रिलीज डेट रमझान, रामनवमी आणि गुढी पाडवा असल्याच्या काळात येत आहे. सणासुदीच्या कालावधीत रिलीज तारीख येत असल्यानं या चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग देखील मिळेल. या चित्रपटाची अधिकृत घोषणा जानेवारी 2024 मध्ये करण्यात आली होती. या चित्रपटाबाबत इंस्टाग्रामवर असं लिहण्यात आलं होत, "आम्ही तुमच्यासाठी संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' घेऊन येत आहोत. ख्रिसमस 2025ला चित्रपटाद्वारे भेटूया."शेअर केलेल्या पोस्टवर रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या स्वाक्षऱ्याही होत्या.

संजय लीला भन्साळी यांचा शेवटचा प्रोजेक्ट : संजय लीला भन्साळी यांनी नेटफ्लिक्सवर 'हिरामंडी' या वेब सीरीजचं दिग्दर्शन केलं होतं. या वेब सीरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, शर्मीन सहगल, संजीदा शेख, ताहा शाह बदुशा, अध्यायन, शेखर सुमन आणि फरदीन खान यांच्यासारखे स्टार्स दिसले होते. 'हिरामंडी' ही वेब सीरीज वेश्यांचं जीवन आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित होती. या वेब सीरीजमध्ये प्रेम, शक्ती, बदला आणि स्वातंत्र्याचा लढा खूप सुंदर पद्धतीनं मांडण्यात आला.

हेही वाचा :

  1. 'जिगरा'मधील आगामी ट्रॅकमध्ये आलिया भट्टबरोबर दिसणार दिलजीत दोसांझ, नवीन गाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र - Alia Bhatt
  2. रणबीर कपूर पहिला चित्रपट 'सावरिया'च्या अपयशानं खूश, म्हणाला- 'यामुळे आणखी मजबूत झालो' - ranbir kapoor and saawariya Movie
  3. लालबागच्या राजाला भेट देताना विकी कौशलला चाहत्यांनी सेल्फीसाठी धरलं वेठीस - Vicky Kaushals video viral

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.