मुंबई : अजय देवगण स्टारर 'रेड 2' चित्रपटाचा हा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसेल.'रेड 2' चित्रपटामध्ये रितेश देशमुख शक्तिशाली राजकारणी दादाभाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख एक भ्रष्ट राजकारणी असेल.'रेड 2' चित्रपटाचा ट्रेलर हा खूप दमदार आहे. तसेच चित्रपटामध्ये इलियाना डिक्रूज ऐवजी वाणी कपूर झळकेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलंय. 'रेड 2' चित्रपटामध्ये अजय देवगणचा धमाकेदार अंदाज पुन्हा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
'रेड 2'चा ट्रेलर प्रदर्शित : अजय देवगणचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'रेड 2' 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ट्रेलरमध्ये रितेश सौरभ शुक्लाच्या पात्राला काका म्हणताना दिसतो. तसेच ट्रेलरमध्ये, अजय त्याच्या मोठ्या टीमसह रितेश देशमुखच्या घरावर छापा टाकतो. पण त्यांना काहीही मिळत नाही, तरीही ते आपलं काम करत असतात. ट्रेलरच्या सुरुवातीला अजय देवगण दार ठोठावतो आणि म्हणतो, "दार उघडा, दादा मनोहर भाईंच्या नावावर वॉरंट आहे." यानंतर एक आवाज येतो, "तुम्हाला आत हे सशस्त्र लोक दिसतात का?" यावर अजय उत्तर देतो, "तुम्ही सरकारी कर्मचारी बाहेर उभे असल्याचे पाहत आहात." यानंतर, रितेशचा एक संवाद येतो, "चांगले नेते हात घाण करत नाहीत." शेवटी, अजय देवगण रितेशशी फोनवर बोलताना म्हणतो, "जर तुम्ही चक्रव्यूहात अडकलात तर तुम्हाला राग येणारच." यावर रितेश उत्तर देतो, "पांडवांनी महाभारत चक्रव्यूह कधीपासून रचायला सुरुवात केली?" मग अजय उत्तर देतो, "कोण म्हणाला मी पांडव आहे, मी संपूर्ण महाभारत आहे."
'रेड' चित्रपटाबद्दल : 'रेड' हा 2018मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटामध्ये अजय देवगणच्या विरुद्ध सौरभ शुक्ला होता. दरम्यान 'रेड 2'ची कहाणी आयआरएस अधिकारी अमय पटनायक यांच्यावर आधारित असेल. या चित्रपटाचा ट्रेलर अनेकांना आवडत आहे. अनेकजण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी हिट असल्याचं म्हणताना दिसत आहेत.
हेही वाचा :