ETV Bharat / entertainment

अजय देवगण आणि रितेश देशमुख अभिनीत 'रेड 2'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - RAID 2 MOVIE TEASER OUT

अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'रेड 2'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Raid 2
रेड 2 ('रेड 2' (Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : March 28, 2025 at 12:12 PM IST

2 Min Read

मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख स्टारर बहुप्रतीक्षित 'रेड 2' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची नुकताच टीझर रिलीज केला आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 1 मे रोजी रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यामुळे अजय आणि रितेशचे चाहते आनंदी झाले आहेत. 'रेड 2'चा टीझर हा अनेकांना पसंत पडत आहे. आता यावेळी 'रेड'च्या सीक्वेलमध्ये खूप काही वेगळं पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. 'रेड 2' चित्रपटामध्ये रितेश देशमुख एका राजनेत्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलं आहे.

'रेड 2' चित्रपटाचा टीझर रिलीज : या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि रितेश देखमुख व्यतिरिक्त वाणी कपूर, सौरभ शुक्ला आणि रजत कपूर हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. टीझरच्या सुरुवातीला अजय देवगणची एक झलक दाखविण्यात येते. यानंतर सौरभ शुक्ला हे दादाभाई (रितेश देशमुख)च्या घरावर पडण्याऱ्या रेडबद्दल बोलताना दिसतात. अचानक अमय पटनायक (अजय) हा दादाभाईच्या घरी रेड टाकतो. यानंतर दादाभाई हा फोनवर अमय पटनायकबरोबर बोलताना दिसतो. यामध्ये दादाभाई म्हणतो, "पांडव कधीपासून चक्रव्यूव्ह रचायला लागले." यानंतर अमय पटनायक म्हणतो, "मी कधी म्हटलं की, मी पांडव आहे. मी पूर्ण महाभारत आहे.' या चित्रपटाचा टीझर हा खूप धमाकेदार आहे.

अजय देवगणची पोस्ट : दरम्यान 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड' हा चित्रपट जबरदस्त होता. या चित्रपटामध्ये अजयबरोबर इलियाना डिक्रूझ दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. दरम्यान 'रेड 2'ची कहाणी आयआरएस अधिकारी अमय पटनायक यांच्यावर आधारित असणार आहे. आयकर विभाग, वास्तविक छापे कसे टाकतात असं या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये रितेश खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अजय देवगणनं या चित्रपटाचा टीझर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिलं आहे,'74वा छापा, 4200 कोटी. यावेळी सर्वात मोठा उत्सव असेल!, 'रेड 2'चा टीझर आता आला आहे! 1 मे 2025 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होत आहे.' आता अजयच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन, त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. अजय देवगण - रितेश देशमुख अभिनीत 'रेड 2'मधील पोस्टर रिलीज, वाचा सविस्तर...
  2. अजय देवगण स्टारर 'रेड 2'ची रिलीज डेट जाहीर, निर्मात्यांनी स्टार कास्टचा केला खुलासा - Ajay Devgan
  3. 'रेड 2' मध्ये वाणी कपूर आणि रितेश देशमुख करणार स्क्रीन शेअर, अजय देवगणसोबत!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.