ETV Bharat / entertainment

'केसरी'तील स्वतःच्या भूमिकेबद्दल आर माधवनच्या मनात तिरस्कार निर्माण झाला, जाणून घ्या काय घडलं.. - R MADHAVAN ROLE IN KESARI

'केसरी' चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी अमृतसरमध्ये आला होती. सुवर्णमंदिरमध्ये प्रार्थना केल्यानंतर अक्षय कुमार आणि आर माधवननं अनेक खुलासे केले आहेत.

R MADHAVAN
Etv Bharatआर माधवन ((Photo: Getty))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 15, 2025 at 2:15 PM IST

Updated : April 15, 2025 at 8:59 PM IST

2 Min Read

अमृतसर - अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर माधव दमदार भूमिका असलेला 'केसरी २' ( 'केसरी चॅप्टर 2: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग' ) हा चित्रपट १८ एप्रिल रोजी देशभर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यासाठी चाहत्यांच्यामधील उत्साह वाढवण्यासाठी कलाकार देशभर प्रमोशन करत आहेत. जालियनवाला बागमध्ये घडलेल्या क्रूर हत्याकांडाची घटना वेगळ्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर आणणारा हा चित्रपट पंजाबमध्येही मोठा औत्सुक्याचा विषय बनला आहे. केसरीची टीम प्रमोशनच्या निमित्तानं अमृतसरमध्ये आली होती. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी सुवर्णमंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. यानंतर माध्यमांशी वार्तालापाचा कार्यक्रमही पार पडला.

'केसरी' चित्रपटाची जेव्हा पूर्वतयारी सुरू केली तेव्हा सर्वात चांगली गोष्ट काय वाटली होती?, असं विचारलं असता अभिनेता आर माधवन म्हणाला, "माझ्यासाठी तर सर्वात मजेशीर गोष्ट ही होती की, व्यक्तीरेखेचं नाव आहे शंकर नायर आणि ती भूमिका अक्षय सर करत होते आणि मी आहे माधवन आणि करत होतो एक उत्तरेकडील व्यक्तीरेखा. मला एक अशी भूमिका मिळाली ज्याच्यामुळं मला हे समजण्याची संधी मिळाली की, आम्ही भारतीय असूनसुद्धा काही वेळा आपल्या स्वार्थासाठी कशा चूका करत असतो. शत्रू केवळ बाहेर नाहीत तर काही जण आपल्यामध्येही आहेत, ज्यांना मारणं खूप आवश्यक आहे. ही व्यक्तीरेखा साकारत असतानाच मला स्वतःबद्दलच एक प्रकारे घृणा वाटू लागली. तेव्हा मला वाटलं की मी योग्य करत आहे. आता चित्रपटाचं पुढं काय व्हायचं ते होईल परंतु मी या चित्रपटाबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे."

'केसरी' टीम प्रमोशन (Etv Bharat)

'केसरी चॅप्टर 2: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग' चित्रपटाची कथा अतिशय धक्कादायक आहे. जेव्हा जालियनाला बागचे हत्याकांड घडले त्यानंतर जनरल डायरवर ब्रिटीश साम्राज्यानं कठोर कारवाई केली नाही आणि तो सुखरुप इंग्लंडला परतला. मात्र त्यानंतर काही काळानं शंकर नायर या दक्षिण भारतीय व्यक्तीनं इंग्लंडच्या कोर्टात यासंबंधी केस दाखल केली आणि झालेल्या प्रकरणाचं समर्थन करणारी बाजू नेव्हिल मॅकिन्ली या भारतीय वकिलानं मांडली होती. हा खटला ब्रिटीश साम्राज्याला हादरवून टाकणारा ठरला. यामधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. इतिहासातलं एक अतिशय काळकुट्ट प्रकरण सर्वांसमोर उघड झालं. यामध्ये वकील सी. शंकरन नायरची भूमिका अक्षय कुमार साकारत असून नेव्हिल मॅकिन्लीच्या भूमिकेत आर माधवन दिसणार आहे. 'केसरी चॅप्टर 2' हा चित्रपट येत्या 18 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -

Last Updated : April 15, 2025 at 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.