मुंबई : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'किंग'ची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे. 'किंग' चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणचं नाव पुढं आलं होतं. आता या चित्रपटामध्ये दीपिका नाही तर पंजाबमधील एक टॉप अभिनेत्री शाहरुखबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. ईटीव्ही भारतच्या मनोरंजन पत्रकारानं शाहरुखच्या 'किंग'मध्ये कोण दिसणार याची पुष्टी केली आहे. पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा शाहरुख खानबरोबर 'किंग' चित्रपटात झळकणार आहे. आता ही अभिनेत्री 'किंग' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे.
सोनम बाजवा दिसणार 'किंग' चित्रपटात : अभिनेत्री सोनम बाजवा बॉलिवूडमध्ये एक जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आजकाल ती बॉलिवूडमध्येही आपली मजबूत पकड निर्माण करत आहे. सोनम ही पंजाबची एक टॉप अभिनेत्री आहे. ती हिंदी चित्रपटांमध्ये दिसते, पण यावेळी तिच्याकडे एक मोठा प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन देखील विशेष भूमिकामध्ये दिसणार आहेत. अलीकडेच सोनम लंडनमध्ये तिच्या नवीन हिंदी चित्रपट 'हाऊसफुल 5'च्या शूटिंगमध्ये सहभागी झाली होती. आता ती रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या 'बागी 4'मध्येही झळकणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर टायगर श्रॉफ दिसणार आहे.
'किंग' चित्रपटाचं शूटिंग कधी सुरू होईल : तसेच पॉलीवूडशी संबंधित तिच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती 'गोडे गोडे चा 2'वर वेगानं काम करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कुमार अरोरा करत आहेत. या चित्रपटात तिच्याबरोबर एम्मी विर्क दिसणार आहे. 'गोडे गोडे चा 2' चित्रपटाची कहाणी जगदीप सिद्धू यांनी लिहिली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. दरम्यान 'किंग' चित्रपटाचं शूटिंग मे महिन्यात सुरू होणार असल्याची अफवा होती, मात्र या चित्रपटाचं शूटिंग थोडे लांबले आहे. आता या चित्रपटाचं शूटिंग जून 2025पासून सुरू होत आहे. 'किंग' चित्रपटाचं शूटिंग भारतातील काही भागात केलं जाणार आहे. 2026च्या अखेरीस हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होऊ शकतो. तसेच 'किंग' चित्रपटामध्ये सोनम ही कुठली भूमिका साकारेल हे अद्यापही समोर आलेलं नाही.
हेही वाचा :